शेवग्याच्या पानाची वडी / टिक्की/कटलेट (shevgachua panachi vadi recipe in marathi)

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

#cooksnap
#prajakta patil यांची रेसीपी.... ताई खूप छान झाली आहे. पहिल्यांदा केली आणि खाल्ली सुधा पहिल्यांदाच.. Thanku so much for recipe ☺️

शेवग्याच्या पानाची वडी / टिक्की/कटलेट (shevgachua panachi vadi recipe in marathi)

#cooksnap
#prajakta patil यांची रेसीपी.... ताई खूप छान झाली आहे. पहिल्यांदा केली आणि खाल्ली सुधा पहिल्यांदाच.. Thanku so much for recipe ☺️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5-6 सर्विंग
  1. 2मोठी वाटी शेवग्याचा बारीक चिरलेली पाने (कोवळी पाने उत्तम)
  2. 1 वाटीज्वारी, बाजरी, नाचणी मिक्स पीठ
  3. 1 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 2ते 3 हिरव्या मिरच्या
  5. 2 वाटीबारीक चिरलेला कांदा
  6. 1 वाटीबेसन
  7. 2 चमचातांदळाचे पीठ
  8. 1 चमचाहळद
  9. 1 चमचाजिरे पूड
  10. 1 चमचाधणे पूड
  11. 1 चमचाओवा
  12. चवीनुसार मीठ
  13. 1 चमचाआले लसुण पेस्ट
  14. 8 ते 9 कडीपत्याची पाने बारीक चिरून
  15. तळण्यासाठी तेल
  16. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    शेवग्याची पाने बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्या.

  2. 2

    चिरलेल्या पानात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ज्वारी बाजरी नाचणी मिक्स पीठ, बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ, जिरे पूड, धणे पूड, आले लसुण पेस्ट, कडीपता, मिरची, ओवा मिसळून थोड्यावेळ बाजूला ठेवा. कांद्याचे पाणी सुटेल म्हणून आवश्यकतेनुसार पाणी घालावे.

  3. 3

    आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट असा गोळा करून घ्या. छोटे छोटे गोलाकार वडी किवा कटलेट बनवून तेलात सोडा. दोन्ही बाजूने व्यवस्थित सोलो फ्राय करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
रोजी

Similar Recipes