मिसळीची भाकरी (mislichi bhakri recipe in marathi)

सध्याच्या भेदरलेल्या परिस्थितीमध्ये स्वतःसोबत परिवाराची सुद्धा काळजी घेणे अनिवार्य आहे प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल याचा प्रत्येक सुगरणी ने विचार करायला हवा त्यामुळे जेवणात विविधते सोबतच पौष्टिक पदार्थ समाविष्ट करण्याच्या हेतूने आज ही भाकरी तयार झाली
मिसळीची भाकरी (mislichi bhakri recipe in marathi)
सध्याच्या भेदरलेल्या परिस्थितीमध्ये स्वतःसोबत परिवाराची सुद्धा काळजी घेणे अनिवार्य आहे प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल याचा प्रत्येक सुगरणी ने विचार करायला हवा त्यामुळे जेवणात विविधते सोबतच पौष्टिक पदार्थ समाविष्ट करण्याच्या हेतूने आज ही भाकरी तयार झाली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वर दर्शवलेले सर्व साहित्य एका पराती मधे घेऊन उकळते पाणी घालून भाकरीचे पीठ छान मळून घ्यावे व पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवावे
- 2
आता परातीतच एकेक भाकरी हाताने थापून घ्या व तव्यावर शेकून घ्या
- 3
दोन्ही बाजूने एक एकदा तव्यावर शेकलेली भाकरी आता गॅस वर शेकून घ्यावी वर दिलेल्या प्रमाणात चार भाकरी तयार होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स धान्याची भाकरी(बेरड्याची) (Mix Dhanyachi Bhakri Recipe In Marathi)
#WWRविंटर रेसिपीज चॅलेंज थंडी ला सुरवात झाली की जेवणात खुप रुची येते. वातावरणाशी पोषक असे पदार्थ यावेळी केल्या जातात. त्यात मिक्स धान्याची भाकरी जेवणाची लज्जत वाढते. Suchita Ingole Lavhale -
ज्वारी बाजरी भाकरी. (jowari bhakri recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड--Jowar..ज्वारी.. ज्वारीची भाकरी शरीरासाठी अतिशय पौष्टीक असून बाजरीच्या तुलनेत शीत (थंड) गुणाची, पचावयास हलकी असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी ऊर्जादायी ठरते. ज्वारीची भाकरी पचनक्रिया सुरळीत ठेवते व बद्धकोष्ठाचा त्रास कमी करते आणि मुळव्याधीचाही त्रास होत नाही..पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी..acidityहोत नाही. यातील तंतुमय पदार्थ व अँटीऑक्सिडेंटमुळे लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी व रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे सोपे जाते. नियमित आहारात ज्वारीची भाकरी घेतल्याने शरीरात अतिरिक्त चरबी (मेद) साठत नाही. ज्यांना वजन कमी करण्याची ईच्छा आहे त्यांनी तर रोज जेवणात ज्वारीचा समावेश करावा. हाडांची मजबुतीवर गुणकारी आहे.ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.लालपेशींचीवाढ होण्यासमदतहोते.गुगलस्त्रोत.. ज्वारी व बाजरी एकत्र करून हिवाळ्यात भाकरी खाव्यात.. चला तर मग गरमागरम भाकरी करु या. Bhagyashree Lele -
नाचणी,ज्वारी भाकरी (Nachni jowari bhakri recipe in marathi)
#भाकरी...#नाचणी ज्वारी भाकरी... Varsha Deshpande -
ज्वारी बाजरी ची भाकरी
अस्सल मराठमोळ्या भाकरी ची चव ... साधी सोपी पण बहुतेकांना ना जमणारी... Swayampak by Tanaya -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी पिठलं भाकरीची चव हि वेगळीच ठरते. त्याची सर कशाला नाही. Prachi Phadke Puranik -
"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी"(Multi Grain Pithachi Tilachi Bhakri Recipe In Marathi)
#TGR"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी" महाराष्ट्रात मकरसंक्रांत ३ दिवस साजरी केली जाते- भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी , तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मऊसूत तूप घातलेली खिचडी हे ह्या सणाचे मुख्य आकर्षण!चला तर मग आज आपण मस्त तीळ लावून खरपूस अशी भाकर बनवूया...♥️ Shital Siddhesh Raut -
ज्वारीची भाकरी (Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपी :: रात्रीचा जेवणात गरम गरम ज्वारीची भाकरी असणे म्हणजे , सोने पे सुहागा .. करायला सोपी व पचायला हलकी.. सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे पीक मुबलक प्रमाणात येते . त्यामुळे सर्रास प्रत्येकाच्या घरी भाकरी केली जाते . गरम भाकरीबरोबर पिठलं , वांग्याची भाजी , अंबाड्याची भाजी , आमटी ही विशेषत्वाने मस्त लागते . कृती पहा Madhuri Shah -
-
तीळ लावलेली बाजरी भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#cooksnap- थंठीमध्ये हमखास केली जाणारी बाजरी भाकरी अतिशय पौष्टिक आहे, तेव्हा मी स्मिता ताई पाटील यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. केली आहे. Shital Patil -
तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)
थापून केलेली भाकरी स्वादिष्ट लागते. लगेच नाही जमत पण सवयीने नक्की बनविता येते. आधी लहान करायला शिका. हळूहळू मोठी भाकरी करण्यास शिकाल. Seema More Salvi -
गावरान पद्धतीने ज्वारी ची तिळ लावून भाकरी (Gavran Jwari Chi Til Laun Bhakri Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसीपी#ज्वारी#भाकरी Sampada Shrungarpure -
मीक्स पिठाची फूलका भाकरी (mix pithache fulka bhakhri recipe in marathi)
#HLR #हेल्दी_रेसिपी ...आज मी सगळ्या डाळी ,धान्या मीक्स करून पिठ दळले आणी त्याची पातळ फूलका टाईप भाकरी बनवली ...हेल्दी पचायला हलकी अशी ही तिखट मीठ टाकलेली दह्या सोबत ,चटणी सोबत सूद्धा नूसती छान लागते ....पण मी गरम ,गरम वांग्याच्या भाजी सोबत सर्व केली ..खूप छान लागते ..आणी तब्येतीला पण छान .... Varsha Deshpande -
झणझणीत पिठलं भाकरी (Pithl Bhakri Recipe In Marathi)
#HV थंडीच्या दिवसात गरमागरम झणझणीत असे खावेसे वाटते.जेवताना पण अगदी वाफाळतं जेवण असावे असं वाटत. मग घरातील मंडळींचा विचार करून तव्यावर बनवलेली गरमागरम भाकरी आणि पिठलयाचा बेत. Saumya Lakhan -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरी ही गुणधर्माने उष्ण असल्याकारणाने हिवाळ्यात बाजरी चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो महाराष्ट्रीयन जेवणात बऱ्यापैकी भाकरीचा समावेश असतो त्यामुळे बाजरीची भाकरी ही लोकप्रिय आहे संक्रांतीच्या या आधी भोगी चा सन साजरा केला जातो यामध्ये बाजरीची भाकरी तीळ लावून बनवलेली जाते आज आपण हीच तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहोत ताजा लोण्या सोबत खाल्ली जाते चला तर मग आज बनवूयात बाजरीची तीळ लावून भाकरी Supriya Devkar -
-
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंचजगात कुठेही जावा..मराठी माणसाला पिठलं भाकरी खाल्यावर जे काही समाधान मिळते ते सांगता येत नाही.. अहाहा.☺️☺️माझ्यासाठी ही तर खूपच भारी डिश आहे...बर्गर, पिझ्झा, चाट असे आम्ही रोज नाही खाऊ शकत बट रोज भाकरी खाऊ शकतो...तशीच मी आज नाचणी ची भाकरी आणि पिठलं बनवले आहे ..नाचणी कॅल्शियम चे स्तोत्र असते सो म्हणले याच्या भाकरी करू... Megha Jamadade -
तांदळाच्या उकडीची भाकरी (tandyachi ukdichi bhakri recipe in marathi)
कोकणात फिरायला किंवा कोणाच्याही घरी गेलं की समोर येते गरमागरम #तांदळाच्या #उकडीची #भाकरी. मऊ लुसलुशीत भाकरी चवीला अतिशय सुंदर लागते आणि अगदी पोटभरीची असते.आज मी तुम्हाला त्याचीच रेसिपी सांगणार आहे. Rohini Kelapure -
-
-
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरीची भाकरी स्पेशल रेसिपीज चॅलेंज😋😋चारूशिला ताई यांची बाजरीची भाकरी ही तीळ लावून रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान झाली मी वांग्याच्या भरीत सोबत डिश सर्व्ह केली खुप टेस्टी टेस्टी झाली🤤🤤👌👌🙏🙏 Madhuri Watekar -
भाकरी ड्राय फ्रुट्स बाईट्स (bhakhri dry fruits bites recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे तयार भाकरी पासून, ड्राय फ्रुट्स घालून मस्त मजेदार बाईट्स बनवले आणि घरच्यांना खायला दिले. इतके सुंदर दिसत होते की घरचे सगळे काही वेळ भाकरी बाईट्स न खाता नुसते बघतच राहिले. आणि जेव्हा खाल्ले तेव्हा भाकरी पासून बाईट्स बनवले आहेत हेच ओळखले नाही. टेस्ट तर एकदम मस्तच आली होती. अगदी लगेचच सगळे बाईट्स संपवले. अगदी कमी साहित्यात करायला एकदम झटपट आणि खूप सोपा असा हा पौष्टिक पदार्थ आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
केळीच्या पानातील भाकरी (पानगी) (bhakri recipe in marathi)
#आईतांदळाची भाकरी बनविण्याच्या ज्या विविध पद्धती देशभर प्रचलित आहेत त्यातील केळीच्या पानातील भाकरी हि अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण पद्धत आहे. हि भाकरी विशेषतः बाळंतीण स्त्रियांना दिली जाते. केळीच्या पानात शिजवल्यामुळे त्याला एक सुंदर चव येते.तशी आईची आवड निवड असं काही नाही. जे पानात पडेल ते खावं आणि काहीही शिल्लक ठेवू नये हि तिची शिकवण. तिचाच एक ठेवणीतला पदार्थ आज इथे तुमच्या सोबत share करते. Ashwini Vaibhav Raut -
पौष्टिक कोथिंबीर मिनी थेपला (kothimbeer thepla recipe in marathi
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर रेसिपीहे कोथिंबीरीचे थेपले फार पौष्टिक बनतात. लहान मुलांसाठी तर खुप छान पदार्थ आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची पिठं असल्यामुळे ते पौष्टिक बनतात. तसेच ते लहान आकाराचे केल्यामुळे मुले आवडीने खातात. त्यावर चीज टाकूनही खाऊ शकतो. shamal walunj -
मिश्र पिठाची भाकरी (mishra pithachi bhakari recipe in marathi)
मैत्रिणींनो , ज्वारीच्या पिठाची भाकरी करणे सगळ्यांना जमते असे नाही... अशावेळी ज्वारीच्या पिठात इतर पीठ टाकून जर भाकरी केली तर ती लाटता येते आणि पौष्टिकही होते . म्हणून मी आज मिश्र पिठाची भाकरी आणलेली आहे. करून पहा... Varsha Ingole Bele -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrसर्व धान्याचं पीठ ,मीठ ,तिखट ,तीळ ,ओवा,कसुरी मेथी अशी ही पौष्टिक पुरी होते रुचकर व अतिशय पौष्टिक असते. Charusheela Prabhu -
मल्टि मिलेट भाकरी पिझ्झा (millet bhakhri pizza recipe in marathi)
#GA4#week22#पिझ्झामाझी 100 सुपर हेथ्यी रेसिपी खूप भाज्या व चीज ने परिपूर्ण चवीला एकदम चमचमीत क्रि स्पी टेस्टी व हेथ्यी तुम्हाला आवडेलच Charusheela Prabhu -
रागी (नागली ची भाकरी) (naglichi chi bhakhri recipe in marathi)
#GA4 #Week20रागी ही नाचणी/ नागली ह्या नावाने संबोधल्या जाते अतिशय पौष्टीक भरपुर प्रमांणात कॅल्शियम असणार रागी लहानांपासुन तर मेठ्यांपर्यंत सर्वांना चालणारी आहे, ह्यापासुन डोसा, उतप्पा, इडली , कुकीज , नानकटाई ,ढोकळा,पेच, पराठा ... असे बरेच पदार्थ बनवतां येतात, पण मी आज नागली ची भाकरी नासत्यासाठी बनविली आहे, गरम भाकरी त्यावर साजुक तूप व गुळ असा ही मेनु , चला तर मग बघु या ... Anita Desai -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1खूप पौष्टिक व टेस्टी होतात Charusheela Prabhu -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
# हिवाळी विशेष थंडी चेदिवसात बाजरी खाण्यास चांगलीअसते. सोबत मेथी ची भाजी ठेचा.:-) Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या