जलेबी कुरकुरीत होममेड (jalebi recipe in marathi)

#cooksnap
#jalebi
#jilbi
जिलबी अर्थात मराठीत जिलबी म्हणुन ओळखला जाणारा हा पदार्थ खुप प्रसिध्द आहे तो त्याच्या चवीमुळे आणि त्याच्या दिसण्यामुळे देखील. खरं तर हा असा पदार्थ आहे जो बनवण तसं फार सोप आहे आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा असा हा पदार्थ आहे. गोड पदार्थांमध्ये ब-यापैकी स्वस्त आणि खायला मस्त असं या पदार्थांचं वर्णन आपल्याला करता येईल.
जलेबी कुरकुरीत होममेड (jalebi recipe in marathi)
#cooksnap
#jalebi
#jilbi
जिलबी अर्थात मराठीत जिलबी म्हणुन ओळखला जाणारा हा पदार्थ खुप प्रसिध्द आहे तो त्याच्या चवीमुळे आणि त्याच्या दिसण्यामुळे देखील. खरं तर हा असा पदार्थ आहे जो बनवण तसं फार सोप आहे आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा असा हा पदार्थ आहे. गोड पदार्थांमध्ये ब-यापैकी स्वस्त आणि खायला मस्त असं या पदार्थांचं वर्णन आपल्याला करता येईल.
कुकिंग सूचना
- 1
मैदा, बेकिंग पावडर, दही आणि पाणी एका भांडयात टाकुन त्याला चांगल्या प्रकारे मिसळुन घ्या. मिसळल्यानंतर त्याला चांगले फेटुन मुलायम होईपर्यंत फेटा.
- 2
साखरेला पाण्यात टाकुन चांगला घट्ट पाक तयार करा. चांगला पाक तयार होण्याच्या 1 मिनीटा आधी त्यात खाण्या चा रंग आणि इलायची पावडर टाका
- 3
आता कढईत तेल किंवा तुप गरम करा आणि गोलाकार चकलीच्या आकाराच्या छोटया छोटया जिलब्या त्यात सोडा. एका वेळी काहीच जिलब्या तळया.
- 4
जिलबीला तोपर्यंत तळत राहा जोपर्यंत त्याचा रंग हलका सोनेरी होत नाही आणि ती कुरकुरीत होत नाही.
- 5
तळल्यानंतर त्या जिलबील बाहेर काढा आणि किचन पेपर वर ठेवा जेणेकरून त्यातील तेल किंवा तुप निघुन जाईल आणि त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवा. 4 ते 5 मिनीटे त्यात ठेवल्यानंतर बाहेर काढा.
- 6
शेवटी पाकातुन काढुन सव्र्ह करा गरमागरम जिलबी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15आजची रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज कूकपॅड वर माझ्या रेसिपी चे शतक पूर्ण होत आहे. आजची रेसिपी बुक ची शेवटची रेसिपी आणि तीही शंभरावे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. जिलबी हा आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट गोड पदार्थ. आयुष्यात कधीही न केलेली जिलबी मी या लॉकडाउनच्या मार्च महिन्यात सर्वात प्रथम केली होती. तेव्हा खूपच धडपड करत मी जिलब्या केल्या होत्या पण यावेळी मात्र आधीच्या अनुभवामुळे जिलब्या करणं खूपच सोपं गेलं.युट्युब वरून घेतलेली आजची ही पनीर जिलेबी रेसिपी इतकी सोपी आहे की पंधरा मिनिटात 14 ते 15 जिलब्या तयार झाल्या सुद्धा आणि त्याही मस्त पाकात मुरलेल्या कुरकुरीत आणि खास पनीरची चव असलेल्या. चला तर मग आपण बघूया माझी ही शंभरावी रेसिपी....माझ्याकडून कूकपॅड टीमला खास धन्यवाद.Pradnya Purandare
-
कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकली रेसिपीजिलेबी न आवडणारी व्यक्ती फार कमी सापडेल आपल्याला. जिलेबी अनेक प्रकारची बनवली जातात खवा जिलेबी, सफरचंद जिलेबी, तुपातली जिलबी,रवा जिलेबी इ.आज आपण झटपट बननारी जिलेबी बघणार आहोत. Supriya Devkar -
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 आज यानिमित्ताने मी झटपट होणारी रव्याची जिलेबी बनवली आहे. .छान कुरकुरीत झाली आहे जिलेबी! Varsha Ingole Bele -
कुरकुरी रसिली केशर जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलेबी#जिलेबीजिलेबी हा पदार्थ हा तिच्या चवीमुळे, दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध असा गोड पदार्थ आहे. लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा...गोड पदार्थांमध्ये बऱ्यापैकी स्वस्त आणि खायला एकदम मस्त असं या पदार्थाचं वर्णन आपल्याला करता येईल.. नाही का..?जिलेबी तुम्ही कशीही खाऊ शकता गरम किंवा थंड. जिलेबी साठी पाक करताना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्याने पाक कडक होत नाही. तसेच जिलेबी तळताना मिडीयम टू स्लो फ्लेम वर तळावी म्हणजे ती कुरकुरीत तळल्या जाते. जिलेबीचे पीठ फेटताना अंदाज चुकायला नको, नाहीतर जर का पीठ पातळ झाले तर जिलेबी देखील पातळ आणि सरळ सरळ पडेल...मी जी जिलेबी केली आहे, यामध्ये कॉर्नफ्लॉवर, आरारोट, तांदळाचे पीठ, या गोष्टीचा बिलकुल वापर केला नाही. तसेच पाकामध्ये एक चमच तूप घातले.. त्यामुळे जिलेबी ला तूपाचा छान फ्लेवर येता. कमी साहित्यात आणि फक्त वीस मिनिटात ही कूरकूरी रसिली केशर जिलेबी तयार होते.... नक्की ट्राय करा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#cooksnap#re-createमी ही रेसिपी सौ.प्रीती साळवे यांच्या रेसिपी वरुन बनावयाचे प्रयत्न केला आहे Bharti R Sonawane -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीआनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी गोडा मध्ये जिलेबी असेल तर मग त्या क्षणाचे महत्व काहीतरी वेगळे होते आणि तो क्षण जर रेसिपी बुक ची सांगता असेल तर मग सोने पे सुहागा. माझी शेवटची रेसिपी.हलवा इकडे भेटते तशी जिलेबी नाही पण आपण घरातच अशाप्रकारे जिलेबी करू शकतो आणि आपल्या आनंदाचा क्षण द्विगुणीत करू शकतो. Jyoti Gawankar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6 जत्रा म्हटली की तिथे फिरणे आणि खाणे आलेच. आणि मग गरमागरम जीलेबीचा स्टॉल दिसला, की खाण्याचा मोह काही आवरत नाही.. तिच जिलेबी केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
पनीरसंत्रा् जिलबी (paneer santra jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15 #चकलीआणि जिलेबीजिलेबी म्हणजे फेमस महाराष्ट्रीयन मिठाई सगळ्या लग्नकार्यात जिलबी हि असतेच म्हणूनच मी पनीर संत्रा जिलबी केली खूप छान झाली. Deepali dake Kulkarni -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
# ks6 जत्रा हा किवर्ड वसईग्रामीण परंपरा जपणारा जत्रा हा उत्सव भारतात बहुतेक सर्वच ठिकाणी आणि सर्व धर्मामध्ये होत असतात. हिंदूंच्या जत्रा, मुस्लिमनाच्या उरूस तर ख्रिस्तींच्या चर्चचे ही फेस्टिवल असतात. मुंबईतील वांद्रे येथे माउंट मेरीची जत्रा भरते.आमच्या गावात राम नवमीला जत्रा असते. जत्रेतील मज्जा काही वेगळीच असते. वेगवेगळे पाळणे, मोठाली चक्र, त्याचा होणारा आवाज. पिपाण्या, तुताऱ्या आणि फुगेवाले त्याच्या वस्तू विकाव्यात म्हणून त्यांच्यात होणाऱ्या चढा ओढीचा गलका. कितीतरी वेगवेगळे पदार्थांचे तम्बू. कुरमुरे, चणे फुटाण्याच्या मोठ मोठ्या राशीं. खेळण्याची, बांगड्याची, दुकान काय घेऊ काय नको असं होऊन जाते.मिठाईचा घमघमाट पसरलेला असतो. त्यात रामाशेटची जिलेबी फेमस मी तशीच जिलेबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. Shama Mangale -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलब्या गरमागरम असताना किंवा निवल्यानंतर, अश्या दोन्ही अवस्थांमध्ये खाल्ल्या जातात. काहीसा चिवटसर, परंतु काही अंशी कुरकुरीत असा संमिश्र पोत असलेल्या या पदार्थास हाताच्या पंजाएवढ्या विस्ताराच्या अनेक वळ्या किंवा वेटोळी असतात. तेलात तळल्यावर पिठाचा रंग तांबूस-केशरी होतो. या वेटोळ्यांच्या बाह्यावरणावर साखरपाकाचा थर असतो. पदार्थाचा वास व स्वाद खुलवायला या साखरपाकात काही वेळा गुलाबपाणी, केवड्याचा सुगंध, तसेच लिंबाचा रस यांसारखे अन्य घटकपदार्थ मिसळले जाऊ शकतात. Purva Prasad Thosar -
जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलबी रेसिपीpost2रेसिपी बुक ची सुरुवात जशी गोडाच्या पदार्थ ने झाली तसेच रेसिपी बुक चा शेवटचा पदार्थ देखील गोड पदार्थ ने करुया म्हणूनच गरम गरम साजूक तूपातील जिलबी म्हणजे बहुतेक सर्वांच्या आवडीची.आता ह्याच जिलबी वर मस्त रबडी घालून खाण्याचा ट्रेंड सध्या आहे.जिलबी पण अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पनीर जिलबी,रव्याची जिलबी वगेरेआज आपण पटकन झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत.एकदा तुम्ही घरी जिलबी तयार केली की बघता बघता कधी फस्त होईल कळणार पण नाही. Nilan Raje -
झटपट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 या रेसिपी बुक चा शेवट गोड पदार्थाने ...जिलेबी ..कुरकुरीत रसदार गरमागरम जिलेबी ..ही जिलेबी खूप झटपट होते आणि चव हलवाई च्या जिलेबी सारखी च येते. Shital shete -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15# जिलेबी रेसिपी बुक चँलेज साठी सुरवात जशी गोड पदार्थापासून झाली तसा शेवट देखील गोड पदार्थ नेच झाला खुप छान वाटले या मध्ये सहभागी होऊन व नवीन नवीन प्रकार प्रयोग कला आणि प्रेझेंटेशन बघून खुप छान वाटले व या माध्यमातून नवीन नवीन मैत्रीण भेटल्या थँक्स कल्पना मँम आणि अंकिता मँम हा सुंदर प्लाटफामँ मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद हा तर पहिला प्रयत्न होता अजून खुप काही नवीन गोष्ट शिकणार आहोत Nisha Pawar -
जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक # week15जिलबी हा इराण, तसेच भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये प्रचलित असलेला मिठाईवर्गीय खाद्यपदार्थ आहे. डाळीचे (बेसनाचे) किंवा गव्हाचे आंबवलेले पीठ गोलगोल वेटोळ्यांसारख्या आकारात तेलात सोडून, तळून घेऊन व नंतर साखरेच्या पाकात बुडवून जिलब्या बनवल्या जातात.जलेबी, ज्याला झुलबिया आणि झलाबिया म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय गोड आणि लोकप्रिय अन्न आहे जे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आढळते. हे खोल फ्राईंग मैदा पिठात गोलाकार आकारात तयार केले जाते, जे नंतर साखर पाकामध्ये भिजवले जाते. ते विशेषतः भारतीय उपखंड आणि इराणमध्ये लोकप्रिय आहेत.तसं जिलबी कधी मी बनवली नव्हती. कुकपॅडमुळे संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली आणि जिलेबी..... जिलेबी म्हटलं की तोंडाला पाणी लहानपासून म्हाताऱ्या पर्यंत सगळ्यांना आवडते. जिलेबी मी पहिल्यांदा बनवत आहे. पण असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा केली इतकी छान क्रिस्पीआणि टेस्टी झाली की काय सांगू तुम्हाला पहिल्यांदा मी थोडीशी बनवून बघितली म्हटलं खाते किंवा नाही खात पण केल्यानंतर माझ्या मुलींनी आणि यांनी पूर्ण फिनिश केली. खरंच मैत्रिणींना इतकी छान झाली हॉटेल सारखी बनली विचार येत होता सासरी गेल्यावर सगळ्यांना बनवून खाऊ घालेल. चला तर मग बनवूया जिलेबी प्लीज कशी झाली तर सांगायला नक्की आणि लाईक आणि कमेंट करायला तर विसरू नका आणि काही चुकलं असेल ते पण सांगा. सुधारणा करून अजून छान बनवू..... Jaishri hate -
जत्रेतील जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जिलेबीहा गोडाचा पदार्थ प्राचीन इतिहासापासून आजतागायत लोकप्रिय आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी जिलेबी ही आवर्जून केल्या जाते. जत्रेमध्ये हमखास गरम-गरम जिलेबीचे स्टॉल हा असतोच. आता जिलेबी सोबत रबडी दही असा खाण्याचा प्रघात आहे. आमच्या घरी जिलेबी मुलांना फार आवडते. कुरकुरीत जिलेबी आणि रबडी हे लाजवाब कॉम्बिनेशन आहे. Rohini Deshkar -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स -३मुंबई की शान और जान #वडापावमहाराष्ट्राचा बर्गर म्हणून ओळखला जाणारा, हा #वडापाव खिशाला परवडणारा आणि अबाल वृध्दांचा आवडीचा....😊 Deepti Padiyar -
-
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी ही रेसिपीबुक साठी "शेवट गोड करी" रेसिपी आहे.जिलेबी हा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवतात तसेच शुभेच्छा देताना प्रामुख्याने तोंड गोड करताना असतोच. काही ठिकाणी लग्नामधील जेवणात जिलेबी हा गोड पदार्थ असतो. जेवणाच्या पंगतीमधे नवरा-नवरी एकमेकांना जिलेबीचा घास भरवून उखाणा घेतात, हा एक छानसा विधी असतो. थोडीशी आंबटगोड आणि कुरकुरीत चविची जिलेबी खायला खूप छान लागते. आमच्या कडे सगळ्यांनाच जिलेबी खूप आवडते. माझी लेक तर फक्त घरी केलेल्या जिलब्याच आवडीने खाते. आज Daughter's Day आहे म्हणून मी लेकीच्या आवडीची जिलेबी बनवली. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी हा काही केवळ एक गोड पदार्थ नाही. तो संस्कृतींना जोडणारा आणि संबंधातला गोडवा टिकणारा दुवा आहे. लग्नाच्या पंगतीत जिलेब्यांची किती ताटे उठली, या वरुन पंगतीत पाहुणे किती आणि कसे जेवले याचा अंदाज लावला जातो. पैजा लावून जिलेब्या खाणे, हा खाणाऱ्यासाठी शक्तिप्रदर्शनाचा आणि पाहणाऱ्यांसाठी मनोरंजनाचा एक जुना खेळ आहे. या जिलेबी बाईची चव ज्याने चाखली तो तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. म्हणून तर अनेक राजे-महाराजे, आमिर-उमराव, राजकीय नेते-त्यांचे पक्ष आले गेले, पंचतारांकित हॉटेलांपासून नाक्या-नाक्यावरच्या हलवायाच्या दुकानापर्यंत जिलेब्यांच्या थाळ्या रोज तयार होत असतात.जिलेबीचा मुळ उगम नेमका सांगणे कठिण असले तरी प्राचिन पर्शिया पासून ऊत्तर पश्चिमी भारतापर्यंत त्याची पाळेमुळे सापडतात. जिलेबीची खासियत हिच की तीला कुणीही परके मानले नाही. ती जिथे गेली ती तिथली झाली. कुणी तिला रबडीत बुडवून खाल्ले तरुणी मठ्ठा सोबत. कुणी केशर टाकून तर कुणी ड्राय फ्रूट टाकून मटकावले. आमच्या घरी स्वातंत्र्यदिनाला न चुकता जिलेबी खाण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या गरब्याच्या जागरणाने उसळू पाहणाऱ्या पित्ताला शमवण्यासाठी जिलेबीच हमखास इलाज असते!साखरेच्या पाकात ओथंबून भिजलेली दाताखाली टच् कन फुटते आणि मधुर पाक जिभेवर पसरण्याचा जो एक क्षण असतो... आहाहा! त्यालाच स्वर्ग सुख म्हणतात!!! Ashwini Vaibhav Raut -
झटपट जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15झटपट हलवाया सारखी खुपदा एकल होत की जिलभी फटाफट घरी तयार होते या वर विश्वास नव्हता पण आज करून बघीतल्यावर समजल की खरज पटापट करता येते चला बघु कशी रायची ते Manisha Joshi -
-
रताळ्याची स्वादिष्ट जिलबी (ratalyachi jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलबी हे खूप लोकप्रिय पक्वान्न आहे. पारंपरिक जिलबी मैद्याची करतात. पण आणखी बऱ्याच प्रकारे जिलबी केली जाते. माव्याची बुऱ्हाणपुरी जिलबी अतिशय स्वादिष्ट लागते. पण ती जिलबी करायला जरा कठीण आहे. त्या चवीच्या जवळपास जाणारी ही रताळ्याची जिलबी करायला सोपी आहे आणि पटकन होते. शिजवलेल्या रताळ्यात कॉर्न फ्लोअर आणि दुधाची पावडर घालून मी ही जिलबी केली. खूप स्वादिष्ट झाली जिलबी. Sudha Kunkalienkar -
खवा जलेबी (khava jalebi recipe in marathi)
विदर्भात विशेषकरून अमरावती येथे बरहानपूर “ मावा जलेबी “म्हणजेच ‘खवा जिलेबी’ खूप प्रसिद्ध आहे. जिलबी खव्याची असते, लालसर काळपट रंगाची पण एकदम चविष्ट,रसभरित आणि कुरकुरीत असते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#hr थोडीशी वेगळ्या लूकमध्ये डिझायनर बालुशाही बनवलेली आहे नेहमीपेक्षा थोडी वेगळी नक्की ट्राय करून बघा Suvarna Potdar -
कालाजाम (kala jamun recipe in marathi)
#shr #श्रTवण शेफ वीक3 श्रावण म्हणजे सणांची रेलचेल त्यातच उपासतापास नैवेद्याला रोज नविन गोड पदार्थ आलाच चला तर असाच गोड पदार्थ व त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या (7)