बालुशाही (Balushahi recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#hr
थोडीशी वेगळ्या लूकमध्ये डिझायनर बालुशाही बनवलेली आहे नेहमीपेक्षा थोडी वेगळी नक्की ट्राय करून बघा

बालुशाही (Balushahi recipe in marathi)

#hr
थोडीशी वेगळ्या लूकमध्ये डिझायनर बालुशाही बनवलेली आहे नेहमीपेक्षा थोडी वेगळी नक्की ट्राय करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45-55 मि
15-18 सर्व्हिंग
  1. 1.5 वाटीमैदा
  2. 1/4 वाटीतूप
  3. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. चवीनुसारमीठ
  5. गरजेनुसार पाणी
  6. चिमुटभरखाण्याचा लाल रंग
  7. तळण्यासाठी तेल
  8. पाक बनवण्यासाठी
  9. 1 वाटीसाखर
  10. 1 वाटीपाणी
  11. 1/4लिंबाची फोड
  12. 1 टेबलस्पूनवेलदोडे पावडर
  13. 1/2 टेबलस्पूनजायफळ पावडर
  14. सजावटीसाठी पिस्ता

कुकिंग सूचना

45-55 मि
  1. 1

    प्रथम मैदा मध्ये बेकिंग पावडर, मीठ टाकून मिक्स करून घ्यावे.आता यामध्ये मध्ये तूप ऍड करावे आणि पाच मिनिटं छान हाताने मैद्यामध्ये तूप मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    आता थोडे थोडे पाणी टाकून घट्ट मैदा मळून घ्यावा आणि अर्धा तास झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यावे.

  3. 3

    आता पाक बनविण्यासाठी पातेल्यामध्ये साखर आणि पाणी मिक्स करून लिंबाची फोड पिळुन ॲड करावे आणि मध्यम आचेवर पाक तयार करून घ्यावा साधारण जिलेबीच्या पाका सारखा एक तारी पाक तयार करून घ्यावा. पाक तयार झाल्यावर यामध्ये वेलदोडे पूड आणि जायफळ पूड टाकून मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    बालुशाही बनवण्यासाठी पिठातील एक छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये लाल रंग मिक्स करून घ्यावा.आणि बाकी पिठाचे गोळे करून घ्यावे.

  5. 5

    आता एक गोळा घेऊन हलक्या हाताने लाटण्याने लाटावा माझ्याकडे फ्लावर शेप चे कटर होते मी त्याने खाली फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे फूल कट करून घेतले आपण हाताने सुद्धा फुले बनवू शकतो

  6. 6

    अशाप्रकारे सर्व फुले तयार करून घ्यावीत

  7. 7

    आता एक फुल घेऊन त्यावर ती दुसरे फुल स्टिक करण्यासाठी मी मैदा आणि पाणी मिक्स करून घेतलेले आहे.त्याची पेस्ट मी पहिल्या फुलावर ती लावली त्यानंतर त्यावर ते दुसरे फुल स्टिक केले पुन्हा पेस्ट लावली आणि तिसरे फूल स्टिक केले त्यानंतर लाल रंगाच्या कणके मधून छोटा गोळा घेऊन तो सुद्धा याच प्रमाणे स्टिक करून घेतला अशी हे अष्टर बालुशाही तयार.

  8. 8

    अशाप्रकारे सर्व बालुशाही तयार करून घ्या.

  9. 9

    आता पॅनमध्ये तेल गरम करा आणि मध्यम आचेवर ती सर्व बालूशाही तळून घ्या.

  10. 10

    आता तयार पाकामध्ये एकेक बालुशाही डीप करून बाहेर काढा आणि वरून पिस्ता टाकून मस्त सर्व्ह करा.

  11. 11

    अशाप्रकारे अगदी वेगळ्या डिझाईनर अष्टर फुलासारख्या दिसणाऱ्या बालूशाही अप्रतिम बनल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Similar Recipes