कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cooksnap
#Madhuri Watekar
# कैरीचा मेथांबा
मी आज माधुरी ताईंनी केलेली कैरीचा मेथांबा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी, चटपटीत असा हा मेथांबा झाला. घरी सगळ्यांना आवडला. खूप खूप धन्यवाद माधुरी ताई 🙏🙂
उन्हाळा सुरु झाला कि बाजारात कैरी यायला सुरवात होते. कैरी म्हणटलेच कि लहानापासून ते मोठ्या पर्यंत तोंडाला पाणी सुटते 😋 तर अशा या कैरीची चटपटीत मेथांबा रेसिपी पाहुयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1कैरी
  2. 3-4 टेबलस्पूनगूळ (कैरी किती आंबट आहे त्या प्रमाणे गूळ कमी जास्त करणे)
  3. चवीनुसारमीठ
  4. 1 टीस्पूनमेथी दाणे
  5. 1 टीस्पूनगोडा मसाला
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनहिंग
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. आवश्यकतेनुसार पाणी
  11. 2 टीस्पूनतेल
  12. 1 टीस्पूनजीरे पूड

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कैरीची साल काढून घेणे. नंतर याचे पातळ काप करून घेणे. आता गॅस वर पातेले ठेवून त्या मध्ये 2 चमचे तेल घालावे. तेल तापले कि मोहरी, हिंग, मेथी दाणे, हळद याची खमंग फोडणी करून घेणे.

  2. 2

    आता या फोडणी मध्येकाप केलेली कैरी आणि गूळ घालून परतून घेणे. झाकण ठेवून 2-3 मिनिट वाफ आणावी. आता या मध्ये थोडे पाणी घालावे. व छान पाक होई पर्यंत कैरी शिजवून घेणे.

  3. 3

    त्यातील पाणी घट्ट होण्यास सुरवात होते. आता या मध्ये चवीनुसार मीठ आणि गोडा मसाला आणि लाल तिखट, जीरे पूड घालून घेणे. मस्त छान त्या मसल्या मध्ये आणि मेथी दाणे मध्ये कैरी शिजवून घेणे.आणि गॅस बंद करावा.

  4. 4

    अशाप्रकारे मस्त चटपटीत कैरी मेथांबा तयार झाला. जेवताना तोंडी लावण्यासाठी हा मेथांबा सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes