मोतीचुर केक जार (mootichoor cake jar recipe in marathi)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
Vasai

यातील केक आमच्या घरातील केक एक्स्पर्ट यांच्या guidance खाली बनवला आहे

मोतीचुर केक जार (mootichoor cake jar recipe in marathi)

यातील केक आमच्या घरातील केक एक्स्पर्ट यांच्या guidance खाली बनवला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 39 mins
6 सर्व्हिंग्ज
  1. 6मोतीचुर लाडू
  2. 150 ग्रामबटर
  3. 415 ग्रामसाखर
  4. 510 मिलीदूध
  5. 1 टेबलस्पूनव्हॅनिला एसेन्स
  6. 1 टीस्पूनबेकिंग पॉवडर
  7. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  8. 1/4 टीस्पूनमीठ
  9. 465 ग्राममैदा
  10. 1 वाटीदूध
  11. 100-150 ग्रामक्रीम
  12. 10पिस्ता आणि बदाम प्रत्येकी
  13. बर्फाचे cubes गरजेनुसार

कुकिंग सूचना

1 तास 39 mins
  1. 1

    पिस्ता आणि बदाम लांब चिरून घ्या

  2. 2

    लाडू कुस्करुन घ्या आणि सुक्या ठिकाणी किंवा फ्रिज मध्ये ठेवा

  3. 3

    आता केकसाठी एका बोउलमध्ये प्रथम 150 ग्राम बटर,415 ग्राम साखर क्रीमी होईपर्यंत फेटून घ्या. बिटर असेल तर अतिउत्तम

  4. 4

    त्यात आता 510 मिली दूध घाला, व्हॅनिला एस्सेन्स घाला आणि त्यावर चाळणी ठेवून मैदा चाळून घाला,मग 1 टीस्पून बेकिंग पावडर,मग 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घाला. शेवटी 1/4 टीस्पून मीठ घालून कट अँड फोल्ड पद्धतीने मिक्स करा

  5. 5

    प्री फ्री-हीट ओव्हनमध्ये 180 डिग्री वरती चाळीस मिनिटांसाठी बेक करा जर ओव्हन नसेल तर एक झाड तोबा मध्ये जाड मीठ टाकून वीस मिनिटं तो नीट करून घ्या आणि त्यामध्ये मग चाळीस मिनिटं हा केक बेक करावा केक तयार झालाय की नाही पाहण्यासाठी त्याच्यात एक स्वच्छ सुई किंवा चमचा टोचून पहा जर तो स्वच्छ बाहेर आला तर तुमचा केक तयार आहे

  6. 6

    आता केक थंड करून घ्याचा. आणि तो ही कुस्करुन घ्या.

  7. 7

    एका मोठ्या बाउलमध्ये बर्फ घ्या त्यावर एक छोटा बाउल ठेवा आणि त्यामध्ये विपिंग क्रिम स्टीफ होईपर्यंत फेटून घ्या. 3 मिनिटे मग थांबून 6 मिनिटे असे. त्यात अर्धा लाडूंचा भुगा मिक्स करावे. हलक्या हाताने. 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा

  8. 8

    आता जारमध्ये केकची लेअर त्यावर हलकासा दुधाचा हबका द्या मग त्यावर क्रिम मग थोडा केक मग लाडूची लेअर मग ड्रायफ्रुटस चे काप मग हीच प्रोसिजर जार भरेपर्यंत करा. शेवटी क्रिम,लाडू आणि पिस्ता याने सजवा. थंड करून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
रोजी
Vasai
Community Manager for Cookpad Marathi. Celebrating and Exploring culture through Food
पुढे वाचा

Similar Recipes