बनाना केक (Banana cake recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#CDY
लहान मुलांना आवडेल असं सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनाना केक.
मी इथे मैदा वापरलेला आहे. केक अजून हेल्थी बनवण्यासाठी मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता.
रेसिपी खाली देत आहे.

बनाना केक (Banana cake recipe in marathi)

#CDY
लहान मुलांना आवडेल असं सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनाना केक.
मी इथे मैदा वापरलेला आहे. केक अजून हेल्थी बनवण्यासाठी मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता.
रेसिपी खाली देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 लोक
  1. 2 कपमैदा
  2. 2अंडी
  3. 2पिकलेली केळी
  4. 1/2 कपतेल
  5. 1/2 कपसाखर
  6. 1/4 कपदुध
  7. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  9. 1 टीस्पूनवॅनिला एसेन्स

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम साहित्याची जमवाजमव करून घ्या. ज्या टिन मध्ये केक बनवायचा आहे त्या टिनला तेल व मैदा लावून ग्रीस करून घ्या.

  2. 2

    एका बोल मध्ये अंडी फोडून घ्या. नंतर त्यामध्ये पिकलेली केळी, साखर,तेल ॲड करा. सर्व मिश्रण बीटर ने फेटून घ्या.

  3. 3

    नंतर त्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दुध आणि वॅनिला एसेन्स ऍड करा.सर्व मिश्रण हलक्या हाथाने एकाच दिशेने मिक्स करून घ्या.

  4. 4

    ज्या टोपात किंवा कढई मध्ये केक शिजवायचा आहे त्या टोपला 5 मिनटं प्रिहीट करून घ्या. तयार मिश्रण टिन मध्ये ओतून घ्या व टिनला चार ते पाच वेळा जमिनीवर टॅप करून घ्या. नंतर प्रिहीट केलेल्या टोपा मध्ये टिन ठेवून केक ला मंद आचेवर तीस ते चाळीस मिनिटे झाकण लावून शिजवून घ्या.

  5. 5

    30 ते 40 मिनिटांनी सुरीच्या साह्याने केक शिजला आहे की नाही ते चेक करा.

  6. 6

    केक पूर्ण थंड झाला कि सुईच्या साह्याने केक च्या बाजूच्या कडा सोडवून केक काढून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

Similar Recipes