टी-टाईम बनाना केक (tea time banana cake recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

शीतल मुरांजन यांनी ऑनलाईन दाखवलेली रेसिपी मी करून बघितली. खूप छान झाला केक.
घरातील सर्वांना आवडला.

टी-टाईम बनाना केक (tea time banana cake recipe in marathi)

शीतल मुरांजन यांनी ऑनलाईन दाखवलेली रेसिपी मी करून बघितली. खूप छान झाला केक.
घरातील सर्वांना आवडला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०-४५मिनिटे
५०० ग्रॅम
  1. 3पिकलेली केळी
  2. १ १/२ कप मैदा
  3. 1/2 कपमेल्टेड बटर
  4. 1 कपब्राऊन शुगर किंवा कॅस्टर शुगर
  5. 1/2 टीस्पूनदालचिनी पावडर
  6. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  7. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  9. तुकडेकाजू, बदाम, आक्रोड चे
  10. 1/4 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

४०-४५मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम बाऊलमध्ये चाळणी ठेवून, त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, वेलची पावडर, दालचिनी पावडर घालून चाळून घेणे. भांड्याला तेल लावून घेणे. बटर पेपर लावून घेणे.

  2. 2

    केळ्यांची सालं काढून घेणे. त्याचे बारीक तुकडे करून घेणे व चमच्याने व्यवस्थित कुस्करून घेणे. त्यात ब्राउन शुगर व बटर घालून घेणे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणे. बीटरने चांगले फेटून घेणे.

  3. 3

    त्यात चाळून घेतलेले सर्व पदार्थ व व्हॅनिला इसेन्स घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणे. नंतर बिटरने 5-7 मिनिटे फेटणे. बेकिंग पावडर, सोडा घातल्यानंतर मिश्रण जास्त फेटायचे नाही.

  4. 4

    हे मिश्रण घट्ट च असते. *त्यात दूध घालायचे नाही.काजू, बदाम, पिस्ता,आक्रोड यांचे तुकडे करून घेणे.त्याला मैदा किंवा गव्हाचे पीठ 2-3 चिमूटभर लावून घेणे.म्हणजे तुकडे खाली बसणार नाही.ते घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणे.

  5. 5

    निर्लेपच्या भांड्यात स्टॅन्ड ठेवून, दहा मिनिटे भांडे प्री-हिट करून घेणे.केकच्या भांड्यात मिश्रण घालून दोन-तीन वेळा टॅब करून घेणे. वरून काजू, बदाम लावून सजावट करून घेणे.

  6. 6

    ते भांडे ठेवून, झाकण लावून घेणे व 40 ते 45 मिनिटे बेक करून घ्यावे.30-35 मिनिटांनी टूथपिक ने केक झाला की नाही ते पहावे. केक व्हायला 40-45 मिनिटे लागतातच.

  7. 7

    केक पूर्णपणे थंड झाल्यावरच भांड्यातून काढावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes