हेल्दी थंडाई लाडू (Thandai laddu recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#HSR
#होळी स्पेशिअल रेसिपीज

हेल्दी थंडाई लाडू (Thandai laddu recipe in marathi)

#HSR
#होळी स्पेशिअल रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मिनिट
  1. प्रमाण मेजरींग कप (१ कप २५० मिली)
  2. 1 कपमखाणा
  3. 1/2 कपसाळीच्या लाह्या
  4. 1/2 कपसुके नारळ (खोबरं)
  5. 1/2 कपखडीसाखर
  6. 3/4 कपथंडाई मसाला
  7. 1/4 मेजरींग कप गुलकंद
  8. 1/4रोझ पेटल्स
  9. 2 चमचेसाजूक तूप (गरजेनुसार)

कुकिंग सूचना

३५ मिनिट
  1. 1

    प्रथम थंडाई मसाला तयार करून घेतला. त्यासाठी प्रत्येकी दोन टेबलस्पून काजू, बदाम, मगज, पीस्ता, चारोळी हे थोडेसे भाजून घेतले. तसेच एक टेबलस्पून बडीशोप, खसखस, ४-५ वेलदोडे,८-१० काळीमिरी,१ पींच जावित्री, थोडेसे केशर हे थोडं गरम करून घेतलं. आणि त्यात रोज पेटल व खडीसाखर घालून भाजलेले सर्व मिश्रण मिक्सर मधून पूड करून घेतली.

  2. 2

    आता मखाणे व साळीच्या लाह्या थोड्या भाजून घेवून त्याची मिक्सरवर पूड करून घेतली.

  3. 3

    तसेच खडीसाखरेची पूड करून घेतली. व पाणी घालून कच्चा पाक तयार केला. एक तारी पेक्षाही कमी.

  4. 4

    आता एका पराती मध्ये साळीच्या लाह्या व मकान यांची पावडर, थंडाई मसाला, गुलकंद, रोज पेटल्स सर्व साहित्य मिक्स करून घेतले. आणि वरील पाक यात ओतून मिक्स करून घेतले.

  5. 5

    आता तयार मिश्रणाचे लाडू वळले. अशाप्रकारे आपले थंडाई लाडू तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes