पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#HSR
पुरणपोळी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.महाराष्ट्रातील मराठी घरामध्ये सणावाराला,कार्यपरत्वे,कुळधर्मासाठी पुरणपोळी होत नाही असे घर शोधूनही सापडणार नाही.अतिशय शुभशकुनाची अशी ही पुरणपोळी सर्व समारंभांना परिपूर्णता देते.पुरण म्हणजे सगळ्ं काही पूर्ण झालं,असं माझी आई नेहमी म्हणायची.तिच्या दृष्टीने पुरणावरणाचा स्वयंपाक हा अगदी सोपा आणि समाधान देणारा होता.खूपच सहजपणे ती पुरणपोळी करत असे.कुठे पसारा नाही की काही नाही.हे निरिक्षण करत करतच मीही पुरणपोळी शिकले.कधीही पुरणाचा स्वयंपाक असेल तर आम्हाला एकेक तरी पुरणपोळी करायला ती सांगायचीच.पुरणपोळी आली नाही तर सासरी काय म्हणतील...असं ती नेहमी म्हणायची.त्याच शिस्तीमुळे आज थोडीफार पारंगत होऊ शकले आहे.सासरी आल्यावर माझ्या आतेसासूबाई अतिशय रेखीव पुरणपोळी करायच्या ते पाहिले.माझी गावाकडची काकूही फारच अप्रतिम पुरणपोळी करते.हल्ली बरेचदा बाहेरून ऑर्डर देऊन पुरणपोळी समारंभाला ठेवली जाते,पण आपल्या घरच्यांसाठी छोट्या प्रमाणात असेल तर घरीच स्वतः बनवलेली पुरणपोळी घरच्यांना खायला घालण्यात वेगळाच आनंद असतो.आमच्या आईकडे सोवळ्यात पुरणाचा स्वयंपाक असे.आतासारखे आदल्यादिवशी पुरण तयार केलेलेही चालत नसे.तरी इतका चटपट, वेळेत पुरणाचा स्वयंपाक आई कसा करायची ?असा मला आता प्रश्न पडतो.तेही पुरण पाट्यावर वाटायचे.आता सगळी साधनं आहेत,सोवळंही मागे पडलंय...पण जुनेजाणते सुरेखशी पुरणपोळी करणारे अलवार हात आता नाहीत ही खंत वाटते.
होळीला तर पुरणपोळी व्हायलाच हवी...तीच आज केलीय...येताय ना गरमागरम,भरपूर तुपाच्या धारेने भिजलेली पुरणपोळी...आणि बरोबर उत्तम चवीची कटाची आमटी खायला(माझ्या सुनेच्या हातची खास...पर्फेक्ट चवीची!👍☺️)😋😋🙋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1:30तास
5व्यक्ती
  1. पुरण
  2. 2.5 कपहरभरा डाळ
  3. 5-6 कपपाणी - डाळ शिजवण्यासाठी
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 2 कपपिवळा गुळ चिरुन
  6. 1/2 कपसाखर
  7. 1जायफळ किसून
  8. 1.5 टीस्पूनवेलचीपूड
  9. पुरणासाठी कणिक :
  10. 5 डावचाळलेले गव्हाचे पीठ
  11. 1 डावमैदा चाळून
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1/2 टीस्पूनमीठ(ऐच्छिक-काहीजण घालत नाहीत)
  14. 2 ग्लासपाणी कणिक भिजवण्यासाठी
  15. 1/2 वाटीतेल कणिक तिंबण्याबाठी
  16. 1 डावतांदळाची पीठी - पोळी लाटण्यासाठी

कुकिंग सूचना

1:30तास
  1. 1

    हरभरा डाळ निवडून व स्वच्छ धुवून 4तास भिजवावी. प्रेशरकुकरमध्ये पाणी घालून डाळ शिजण्यास ठेवावी. शिजताना थोडीशी हळद घालावी.पुरणाला रंग छान येतो.कटाची आमटी किती करायची आहे,त्यानुसार डाळ शिजताना पाणी घालावे.म्हणजे शिजल्यावर निथळलेल्या पाण्याचा पुरेसा कट मिळतो.

  2. 2

    कुकर 15मिनिटे मध्यम आचेवर ठेवावा.म्हणजे डाळ छान शिजते.मग 3-4शिट्ट्या करुन गँस बंद करावा. प्रेशर पडले म्हणजे शिजलेली डाळ पातेल्यावर चाळणी ठेवून उपसून ठेवावी.कट पूर्ण निथळू द्यावा.व बाजूला ठेवावा.

  3. 3

    गँसवर कढई तापत ठेवून त्यात शिजलेली व निथळलेली डाळ व गूळ,साखर घालून पुरणास चटका देण्यास ठेवावे.सतत हलवत रहावे.कडेला चिकटत असलेले पुरण उलथण्याने सतत काढून एकजीव करावे.हळूहळू डाळ व गूळ,साखर एकजीव होऊ लागते.व घट्ट होऊ लागते.उलथणे घट्ट असे पुरणामध्ये उभे राहिले, पडले नाही की पुरण पूर्ण शिजले व चटका दिला गेला असे समजावे.खुटखुटीत असे पुरण शिजले पाहिजे.आता जायफळपूड व वेलचीपूड घालावी.गरम असतानाच पुरणयंत्रातून दळून काढावे.आपले पुरणपोळीसाठी लागणारे पुरण तयार आहे.

  4. 4

    पुरणपोळीसाठी १ते२ तास अगोदर कणिक भिजवून ठेवावी लागते,म्हणजे कणिक भिजली की कणकेला तार चांगली येते.जितके पुरण सैल किंवा घट्ट असेल तशीच कणिकही असावी.तरच पोळी सुबक लाटता येते.
    कणिक व मैदा चाळून घ्यावा.त्यात थोडे मीठ व तेल घालून कणिक भिजवावी.शेवटी त्यामध्ये तेल घालून खूप मळून घ्यावी व झाकून ठेवावी.

  5. 5

    पोळी करताना कणिक सारखी करुन घ्यावी.लिंबाएवढी कणिक घेऊन त्याची खोलगट पारी तेल लावून बोटांनी करावी.जेवढा कणकेचा उंडा तेवढेच पुरण घ्यावे.पारीमध्ये पुरण घालून नीट उंडा बंद करावा.तवा एकीकडे मध्यम आचेवर तापत ठेवावा.
    पोळपाटावर तांदळाची पीठी भुरभुरावी व त्यावर हा उंडा हलक्या हाताने थापून खूप हलक्या हाताने पुरणपोळी सगळ्या बाजूंनी एकसारखी लाटावी.तांदळाच्या पीठीने पोळी लाटताना भरभर सरकते.

  6. 6

    लाटलेली पोळी अलगद तव्यावर टाकून खरपूस भाजून घ्यावी.टम्म फुगलेली पोळी हलकेच उलटावी.हवे असल्यास साजूक तूपही तव्यावरील पोळीवर घालून भाजावी.तयार पुरणपोळी कागदावर काढून ठेवावी.

  7. 7

    स्वादिष्ट अशी ही पुरणपोळी भरपूर तूप घालून व बरोबर कटाची आमटी,बटाट्याची भाजी,भजी,पापड-कुरडई यासह सर्व्ह करावी.😋😋👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes