म्हैसूर पाक

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#गोड
मिठाईच्या दुकानात आपण हे म्हैसूर पाक बघतो. तुम्हाला हे घरी बनवता आले तर..... एकदम मिठाईच्या दुकानातल्यासारखे.... अहाहा ..... मी करून बघितली आणि खरंच सांगते एकदम मस्त झाली.

म्हैसूर पाक

#गोड
मिठाईच्या दुकानात आपण हे म्हैसूर पाक बघतो. तुम्हाला हे घरी बनवता आले तर..... एकदम मिठाईच्या दुकानातल्यासारखे.... अहाहा ..... मी करून बघितली आणि खरंच सांगते एकदम मस्त झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. प्रमाण : १ कप - २५० मिली
  2. १ कप तूप
  3. १/४ कप तेल
  4. १ कप साखर
  5. १/२ कप पाणी
  6. १ कप बेसन
  7. लोंफ टिन
  8. जाड टॉवेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम भांड्यात तूप व तेल मिक्स करुन मंद आचेवर गरम करायला ठेवा. दुसरीकडे लोफटीनला किंवा ट्रेला बटर पेपर लावून घ्या.

  2. 2

    दुसऱ्या पॅनवर साखर, पाणी मिक्स करून गरम करायला ठेवा. पूर्ण एकतारी पाक व्हायच्या अगोदर म्हणजेच फक्त साखर विरघळली पाहिजे

  3. 3

    बेसन चाळुन घ्या

  4. 4

    पाकात बेसन घालून गुठळ्या मोडेपर्यंत ढवळा. गुठळ्या पूर्णपणे गेल्यानंतर त्यात गरम करत ठेवलेले तूप-तेल पळीने एक चमचा घालुन सतत ढवळत रहा.

  5. 5

    घातलेले तूप शोषून घेतले की परत तीच क्रिया तेलतुप संपेपर्यंत करत रहा शेवटी फक्त १ च तूप शिल्लक ठेवा. बेसन मस्त फुलायला लागेल, हे सर्व मंद आचेवरच करा.

  6. 6

    शेवटी बेसन फुललं की राहिलेलं १ च तेलतुप टाकून गॅस बंद करून लगेच टिन मध्ये ओता.

  7. 7

    टिन मध्ये मिश्रण ओतलं की एक जाड टॉवेल या टिनभोवती गुंडाळा म्हणजे म्हैसूर पाकाला मस्त जाळी पडून मध्ये लालसर रंग येईल.

  8. 8

    थोडं गरम असतानाच मग टॉवेल काढून सुरीने वड्या करण्यासाठी चीर द्या. पूर्ण थंड झाल्यावरच पूर्ण वड्या कापा. सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes