ढाबा स्टाईल कोल्हापूरी अख्खा मसुर रेसिपी (Dhaba Style Kolhapuri Akkha Masoor Recipe In Marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

ढाबा स्टाईल कोल्हापूरी अख्खा मसुर रेसिपी (Dhaba Style Kolhapuri Akkha Masoor Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
  1. 1 कपमसुर
  2. 4मोठे चमचे तेल
  3. 2कांदे
  4. 1 चमचाजीरे
  5. कोथिंबीर
  6. मीठ
  7. 4लहसुण
  8. 1बेडगी मिरची
  9. 1 मोठा चमचाजीरे
  10. 2 चमचेलाल तिखट
  11. 1/2 चमचागरम मसाला
  12. 1 ग्लासगरम पाणी
  13. 1 चमचाबडीशोपची पूड
  14. 1 चमचाअल + लहसुण पेस्ट

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    रात्री मसुर पाण्यात भिजत घालून ठेवावे. आणि सकाळी किंवा दुपारी चाळणीत घालून त्याचे सर्व पाणी निथळून द्यावे. म्हणजे मसूर छान सुखा होईल. प्रथम कढईत ४ चमचे तेल गरम करून घेणे. त्यात जीरे घालावे ते फुल्ल्यावर त्यात....

  2. 2

    कांदे २ कापलेले घालावे. ते सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे. आता त्यात १ चमचा बडीशोपची पुड आणि १ चमचा अल + लहसणाची पेस्ट घालून छान परतून घ्यावी.

  3. 3

    आता त्यात २ चमचे लाल तिखट आणि हळद, आणि मसुर घालावा.

  4. 4

    नंतर ते छान परत परतून घ्यावे. आता एका साईडला १ ग्लास पाणी गरम करून घ्यावे.आता कोथिंबीर आणि चवी नुसार मीठ घालून परत ते एकत्र करून घ्यावे.

  5. 5

    आता त्यात गरम केलेले पाणी आणि १/२ चमचा गरम मसाला घालून ते एकत्र करून त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे वाफ काढून घ्यावी.

  6. 6

    आता १० मिनिटांनी पाणी थोडे आटल की, भाजी मस्त सुखी होईल.तुम्ही बघु शकता मसूर छान मऊ झाला आहे. जर भाजी खुपच सुखी झाली असेल तर तुम्ही त्यात पाणी थोडे घालू शकता.

  7. 7

    आता तडका देण्यासाठी थोडे तेल गरम करून त्यात १ चमचा जीरे घालून त्यात १ बेडगी घेऊन ती तोडून घालावी आता त्यात लसूण पाकळ्या ४ उभ्या कापून त्यात घालावे.

  8. 8

    आता त्या भाजीत तो घालावा. म्हणजे तडका द्यावा. आता ते छान परत परतुन गॕस १ ते २ मिनिटांनी बंद करावा...

  9. 9

    अश्या प्रकारे मसूर ची सुखी भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes