तांदळाची उकडीची भाकरी (Tandalachi Bhakari Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या भाकऱ्यांचा समावेश करतो, त्यातीलच ही तांदळाची भाकरी.पांढरीशुभ्र आणि लुसलुशीत टम्म फुगलेली भाकरी सर्वांनाच आवडते. कुठल्याही पालेभाजी बरोबर किंवा नॉनव्हेज रस्स्याबरोबर अतिशय सुंदर लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 2 वाट्यातांदळाचे बारीक दळलेले पीठ
  2. 2 वाट्यापाणी
  3. 1/2 चमचामीठ
  4. 1समजा साजूक तूप

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईमध्ये दोन वाट्या पाणी घालून त्यामध्ये मीठ आणि साजूक तूप घालून पाण्याला उकळी आली की तांदळाचे पीठ घालावे व नीट ढवळून दहा मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    नंतर पीठ कोमट असतानाच फूड प्रोसेसर मधून मळून घ्यावे किंवा हाताने पाच मिनिटात व्यवस्थित मळून घ्यावे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे गोळे करून घ्यावेत.

  3. 3

    नंतर व्यवस्थित पोळी सारखे पातळ लाटून घेणे. गरम तव्यावर घातल्यानंतर एका बाजूने त्यावर पाण्याचा स्प्रे करून नंतर उलटुन दुसऱ्या बाजूने थोडी जास्त वेळ ठेवून मग गॅसच्या आचेवरती ठेवून छान फुगवून घ्यावी आणि गरमागरम खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes