चपाती चे चटपटीत सॅन्डविच

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

लहान मुलांसाठी चटपटीत व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.
चपात्या शिल्लक राहिल्यास किंवा नवीन चपात्या बनवून तुम्ही रेसिपी करू शकता.
चपातीला तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावू शकता. ही चटपटीत रेसिपी असल्यामुळे मी चिंचगुळाची आंबट गोड चटणी येथे वापरली आहे.

चपाती चे चटपटीत सॅन्डविच

लहान मुलांसाठी चटपटीत व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.
चपात्या शिल्लक राहिल्यास किंवा नवीन चपात्या बनवून तुम्ही रेसिपी करू शकता.
चपातीला तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावू शकता. ही चटपटीत रेसिपी असल्यामुळे मी चिंचगुळाची आंबट गोड चटणी येथे वापरली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५मिनिटे
२-3 जणांसाठी
  1. 4चपाती
  2. 1-2उकडलेले बटाटे
  3. 1कांदा
  4. 2 टेबलस्पूनगाजराचे एकदम बारीक तुकडे
  5. 2 टेबलस्पूनसिमला मिरचीचे एकदम बारीक तुकडे
  6. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला टोमॅटो
  7. थोडी चिरलेली कोथिंबीर
  8. 1-2 टेबलस्पूनहिरवी मिरची, लसूण ठेचा
  9. 1 टीस्पूनजिरे पावडर
  10. 1 टीस्पूनधने पावडर
  11. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  12. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  13. 1 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  14. चवीप्रमाणे मीठ
  15. पिवळी बारीक शेव
  16. अमूल बटर
  17. 3-4 टेबलस्पूनचिंच गुळाची चटणी किंवा टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी

कुकिंग सूचना

२०-२५मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घेणे. बटाट्याचे साल काढून कुस्करून घेणे. कांदा,टोमॅटो,गाजर, सिमला मिरची,कोथिंबीर सर्व एकदम बारीक चिरून घेणे. चिरलेले सर्व साहित्य एका एकत्र करून घेणे. त्यात लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.

  2. 2

    सर्व मसाले व चवीप्रमाणे मीठ घालून घेणे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे व बाजूला ठेवणे.दोन‌ चपात्या घेऊन त्यांना चिंचगुळाची आंबट गोड चटणी लावून घेणे.

  3. 3

    जे आपण स्टफिंग तयार करून घेतलं, ते एका चपातीवर ठेवून, सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून दाबून घेणे. वरून बारीक शेव टाकून घेणे.

  4. 4

    चिंचगुळाची चटणी लावलेली दुसरी चपाती त्यावर ठेवून घेणे. तव्याला तेल, तूप किंवा अमूल बटर लावून घेणे. चपाती अलगद उचलून तव्यावर ठेवणे.

  5. 5

    एका बाजूने चांगली भाजून घेणे. वरच्या बाजूला पुन्हा बटर लावून घेणे. अलगद उलथणे व हाताचा वापर करून दुसरी बाजू उलटून घेणे. भाजलेले चपातीचे सँडविच ताटात काढून घेणे. पिझ्झा कटरने त्याचे चार भाग करून घेणे.

  6. 6

    अजून बारीक हवे असल्यास अजून त्याचे तुकडे करून घेणे. सजावटीसाठी वरून थोडी चिंचेची चटणी टाकावी. शेव भुरभुरावी.
    खाण्यासाठी तयार चटपटीत चपातीचे सँडविच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes