चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#wdr संडे स्पेशल रेसिपी
ही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.
मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.
तुम्ही नक्की करून बघा.

चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)

#wdr संडे स्पेशल रेसिपी
ही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.
मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.
तुम्ही नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 6-7बोनलेस चिकन तुकडे
  2. 1 लहानकांदा
  3. 1/2टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट किंवा किसून घेणे
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1.5 टीस्पूनचिकन मसाला
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. 1.5 टेबलस्पूनतेल
  11. थोडी कोथिंबीर
  12. 2-3चीज क्यूब किंवा माॅझरेला चीज किसलेले
  13. 1/2 टीस्पूनकसुरी मेथी
  14. 1.5 टेबलस्पूनमैदा
  15. थोडे पाणी
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून घेणे व मिक्सरमधुन त्याचा खिमा करून घेणे. आलं-लसूण किसून घेणे. कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत.*मी इथे मुरवलेले चिकन पीस घेतले आहे. त्यामुळे फोटो तसा दिसतो आहे.

  2. 2

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की कांदा घालून गुलाबीसर भाजून घेणे. नंतर टोमॅटो टाकून 2-3 मिनिटे परतावे. आलं-लसूण पेस्ट घालून परतवून घेणे.नंतर सर्व मसाले घालून परतणे.

  3. 3

    कसुरी मेथी हातावर चोळून घालावी. म्हणजे सुगंध छान येतो.नंतर चिकन खिमा व मीठ घालून मिक्स करून घेणे.2-3 मिनिटे झाकून ठेवावे. गॅस बंद करावा. खिमा पटकन शिजतो. थंड करून घ्यावा.

  4. 4

    एका चपातीचे दोन भाग सुरीने करून घेणे. त्याला टोमॅटो सॉस लावून घेणे. थोडा खिमा एका बाजूला ठेवून घ्या. वरून चीज घालून घेणे.

  5. 5

    एका वाटीत मैदा व थोडे पाणी घालून घट्टसर पीठ कालवून घेणे. पातळ करू नये. चपाती गुंडाळून घेणे. शेवटच्या टोकाला व दोन्ही बाजू पेस्ट लावून बंद करून घेणे. अशाप्रकारे सर्व रोल करून घेणे. *चपातीचे पदर सुटे होत असतील, तेथे पेस्ट लावून घेणे.

  6. 6

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की, मंद आचेवर रोल लालसर तळून घ्यावेत.

  7. 7

    हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes