झणझणीत मिसळ

Preeti V. Salvi @cook_20602564
#goldenapron3 sprouts हा की वर्ड वापरून मोड आलेले मिक्स कडधान्य वापरून झणझणीत मिसळ तयार केली.
झणझणीत मिसळ
#goldenapron3 sprouts हा की वर्ड वापरून मोड आलेले मिक्स कडधान्य वापरून झणझणीत मिसळ तयार केली.
कुकिंग सूचना
- 1
मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य एका ताटलीत घेतले.
- 2
चिरलेला कांदा,लसूण, खोबर, धणे, जिरे लालसर होईपर्यंत परतले.
- 3
परतलेले साहित्य,टोमॅटो,कोथिंबीर, मिरची मिक्सरमधून बारीक केले व कडधान्य शिजवून घेतली.
- 4
कढईत तेल घालून त्यात वाटण तेल सुटेपर्यंत परतले
- 5
मिश्रण छान परतल्यावर शिजवलेली कडधान्य त्यात घातली.
- 6
पाणी घालून छान उकळी काढली.त्यात मीठ घातले.
- 7
बाउलमध्ये फरसाण घेऊन त्यात तयार उसळ घातली,त्यावर कांदा कोथिंबीर घातली.
- 8
झणझणीत मिसळ खाताना त्यासोबत बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाची फोड, थोडे
फरसाण, वाटीत दही घेतले आणि पावांसोबत सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11587406













टिप्पण्या