गोळाभात
#बेसन
विदर्भाचा पारंपारिक पदार्थ
कुकिंग सूचना
- 1
बेसन व रवा सोबत गोळ्याचे सर्व साहित्य एकत्र मिसळवुन
आवश्यक पाण्याने घट्ट भिजवुन पाच दहा मिनिटांनी मुठिया सारखे गोळे बनवुन वाफवुन घ्यावे. - 2
दुसरीकडे भांड्यात भात शिजवायला ठेवावा, हा भात मोकळा असावा त्या मुळे पाणी मर्यादित वापरावे, शिजण्याच्या थोड्या आधीच्या स्थितीमध्ये वाफवलेले गोळे भातामध्ये ठेवावे, व थोड्या वेळाने गॅस बंद करावा.
- 3
फोडणीच्या साहित्याने खमंग फोडणी करून अर्धी फोडणी भातामध्ये घालुन एकदा मिसळवुन घ्यावे.
व सर्व्ह करतांना पुन्हा वरून फोडणीचे तेल घालावे. - 4
विदर्भाचा हा प्रसिद्ध पारंपारिक गोळाभात, तुम्ही मठ्ठा, कढी, सार तत्सम प्रकारासोबत आस्वाद घेऊ शकता. मी आज सोलकढी सोबत आस्वाद घेतला.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12159777










टिप्पण्या