शेगाव कचोरी

खूप खूप दिवसापासून शेगाव कचोरी खाण्याची इच्छा होते शेवटी मग काल फ्रीजमध्ये थोडे हिरवे वाटाणे सापडली मग काय रात्री भिजत घातले सकाळी उठून गरमागरम कचोऱ्या सगळ्यांना नाश्त्याला दिले. कचोरी आपण खूप प्रकारच्या खातो पण शेगावच्या कचोरी ची बातच न्यारी आहे नक्की करून बघा. कचोरी कचोरी शेगाव ची कचोरी. जय गजानन महाराज.

कुकिंग सूचना
- 1
चला तर मग बनवूया शेगाव कचोरी.
- 2
सर्वप्रथम मैदा गव्हाचे पीठ तेल थोडंसं मीठ हे सर्व एकत्र करून घ्यावे थोडे थोडे पाणी टाकून पीठ घट्टसर चांगले मळून घ्यावे. मळुन झाले की ते दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवावे. पंधरा मिनिटानंतर झाकण काढून पिठाचे लिंबा पेक्षा थोडे मोठे गोळे करून घ्यावे
- 3
सर्वप्रथम चार ते पाच तास भिजवलेला हिरवा वटाणा कुकरला लावून शिजवून घ्या त्यातले सर्व पाणी काढून तो वटाणा वेगळा काढून ठेवा. कचोरी साठी एक मसाला तयार करून घेऊया. यामध्ये कोथिंबीर आलं लसूण मिरची त्याची मिक्सरमध्ये भरड करून घ्या. कढई मध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरीची हिंग ची फोडणी द्या व हळद आणि वाटलेला मसाला तेलात टाकून चांगला परतून घ्या
- 4
शिजवून ठेवलेल्या मटारची मिक्सरमध्ये भरड करून त्या मसाला टाकून ते सुद्धा चांगले परतून घ्या. त्यामध्ये बडीशेप, आमचूर पावडर व चवीप्रमाणे मीठ टाकून एकजीव करून घ्या. मसाला तयार झाला की दुसऱ्या एका बाऊलमध्ये काढून थंड करून घ्या.
- 5
पीठाचे गोळे केलेले आहे त्याची अशी वाटी करून घ्यावी त्या वाटीत एक छोटा चमचा वाटण्याचे सारण भरावे व तिला चित्रात दाखवल्याप्रमाणे बंद करून घ्यावी.
- 6
ही कचोरी फुगीर किंवा गोल नसते ती थोडी चपटी असते त्यामुळे मसाला भरलेला कचोरीचा गोळा थोडासा लाटून घ्यावा व तेलात दोन्ही बाजूने चांगला खरपूस तळून घ्यावा.तळलेल्या हिरव्या मिरची बरोबर किंवा खजूर चिंचेची आंबटगोड चटणीबरोबर किंवा खोबर्याच्या चटणीबरोबर ही कचोरी सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या