मोतीचूर लाडू

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. बुंदी साठी
  2. 1 कपबेसन
  3. 1/2 कपपाणी
  4. चिमूटभरकेशरी रंग
  5. तळण्यासाठी तूप
  6. पाकासाठी..
  7. 1 कपसाखर
  8. 1/2 कपपाणी
  9. चिमूटभरकेशरी रंग
  10. 1 टेबलस्पूनदूध
  11. 2 टेबलस्पूनड्राय फ्रूट : बदाम,मनुका,काजू, मगज बी
  12. 1/4 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसन पिठात पाणी आणि केशरी रंग घालून नीट मिक्स केले.

  2. 2

    कढईत तूप तापल्यावर बारीक भोकाच्या चाळणीने बुंदी पाडून तळून घेतली.बुंदी छान मोत्याच्या आकारासारखी दिसते म्हणून तर त्यापासून केलेले.ते मोतीचुरचे लाडू.ह्यापेक्षाअजून बारीक बुंदी पडता आली तर अजुनच छान.

  3. 3

    पातेल्यात साखर,पाणी घालून दोन तारी पाक केला.त्यात केशरी रंग,ड्राय फ्रूट,वेलची पूड घालून मिक्स केले.

  4. 4

    तयार बुंदी गरम पाकात घालून ढवळून घेतली.आणि अर्धा तास झाकून मुरण्यासाठी ठेवली.

  5. 5

    पाक छान मुरला की लाडू वळून घेतले.

  6. 6

    छान मगज बियानी सजवून प्लेट मध्ये लाडू सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes