क्रिस्पी कार्ले (CRISPY KARLE RECIPE IN MARATHI)
स्नैक्स म्हणून माझ्या माहेरी माझा काका खूप छान करतो त्याच्याच कडून मी हि शिकली आणी माझ्या सासरी तर खूप हिट झाली.. ह्याची एक गम्मत सांगते मी शाळेत शिक्षिका आहे तर एकदा मी हे क्रिस्पी कार्ले टिफिन मधे नेले आणी कशे दीस्तात हे फोटो त लक्षात आलेच आसेल.. ह्ह तर सांगायचे असे होते की टिफिन उघडल्या वर माझि एक साउथ इंडियन सहकर्मी एकदम म्हणाली " ये चुहे कहा से लायी" आणी तेव्हा पासुन ह्या डिश ची फर्मायीश करायची असेल तर माझ्या मैत्रिणी म्हणतात " यार वो चुहे बनाके लेके आना"...खूप छान लागतात अजिबात कडू लागत नाही... तर हेच चुहे तुमच्या साठी...

कुकिंग सूचना
- 1
कढईत खोबर किस कोथिम्बीर हळद हिंग धणे जीरे पुड मीठ साखर आमचुर पावडर तिखट घालुन हे सारण हलकेच परतून घ्या, कार्ले धूऊन कोरडे करुन घ्या मधेच चिर देऊन आतल्या बिया काढुन घ्या व पोकळ करुन घ्या
- 2
सारण कार्ल्यात घट्ट भरुन धाग्यानी/दोर्यानी गुंडाळून घ्यावे (फोटोत दाखवल्या प्रमाणे) पँन गरम करण्यास ठेवावा त्यात तेल हळद तिखट मीठ हिंग घालुन सारण भरलेले कार्ले एक एक करुन सोडावे.
- 3
कार्ले कढईत ठेवल्यावर थोडा पाण्याचा हब्का मारावा व 10 मिनिटे झाकुन ठेवा ही प्रोसेस पुन्हा दोनदा करावी व कार्ले छान क्रिस्पी झाले की गैस बन्द करावा व वाफ दबू द्यावी.(कार्ले कोवळे असल्याने लवकर शिजतात). सर्व्ह करतांना दोरा आठवणीने काढावा किन्वा खाणार्यास दोरा काढावयास सांगावे हा हा हा..
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या