मँगो रवा केक (MANGO RAVA CAKE RECIPE IN MARATHI)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#goldenapron3
#week17
#मँगो
सध्या आंब्याचा सिझन आहे पण लॉकडाउन मुळे आंबे मिळण्याची शक्यता कमी होती तरी धनश्रीमुळे आम्हाला आंब्याची पेटी घरपोच मिळाली. मग आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघितले त्यातलीच ही एक रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-३५ मिनिटे
१० जण
  1. 1 कपबारीक रवा
  2. 1/4 कपमैदा
  3. 1/2 कपपिठीसाखर
  4. 1/2 कपतूप
  5. 1 कपआंब्याचं पल्प
  6. चवीनुसार मीठ
  7. 1/2 टीस्पून बेकिंग पावडर
  8. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा

कुकिंग सूचना

३०-३५ मिनिटे
  1. 1

    एक भांड्यात रवा, मैदा, पिठीसाखर, तूप घाला.

  2. 2

    आंब्याचा पल्प घालून सर्व एकजीव करा आणि १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवा.

  3. 3

    १५ मिनिटानंतर मायक्रोवेव्ह १८० डिग्री सेल्सिअस ला १० मिनिटे गरम करायला ठेवा. दुसरीकडे रव्याच्या मिश्रणात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून मिक्स करा. केकटीनला तूप लावून घ्या तळाला परचमेन्ट पेपर लावून घ्या. आता तयार मिश्रण केकटिन मध्ये ओतून टॅप करा वरून ड्रायफ्रूट्सचे तुकडे घाला. प्रिहिट मायक्रोवेव्हमध्ये ठेवून ३०-३५ मिनिटे बेक करा.

  4. 4

    बेक झाल्यावर काढून रॅकवर थंड होण्यास ठेवा, कापून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या (10)

Similar Recipes