कुकिंग सूचना
- 1
साहित्य: मैदा, कॉर्नफ्लॉवर, तुप, मीठ, सोडा, तेल, बोईल बटाटे म्याश करुन घेणे. मग कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबिर कापुन घेणे.
- 2
एका भांड्यात मैदा, 2 टिस्पून कॉर्नफ्लॉवर, चवीपुरत मीठ, 1/2 टिस्पून सोडा, घालुन मिश्रण एकजीव करून घ्यावे. मग त्यात 2 टीस्पून तुप टाकून.
- 3
पीठ मळुन घेणे. आणि वरून पिठावर वल कपडा झाकून ठेवा 5-10 मिनिटं. पीठ भीजे पर्यंत आपण आतल सारण भरण्यासाठी मिश्रण तयार करू.
- 4
एका पॅनमध्ये 2 टीस्पून तेल टाकून. तेल कोमट गरम झाल्यावर मग त्यात जिरे ची फोडणी देऊ. मग त्यात हिरवी मिरची लसूण, कोथंबीर च्या काड्या टाकून फोडणी देऊ. मग त्यात कांदा टाकू 2-3 मिनिट परतून घ्या.
- 5
2-3 मिनिट झाल्यावर त्यात मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. मग त्यात बॉईल केलेले बटाटे, कोथिंबीर टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. 2-3 मिनिट परतून घ्या. मग गॅस बंद करा
- 6
5-10 मिनिट झाल्यावर पीठ चांगलं मळून घ्या. आणि पिठाचे गोळे तयार करून घ्या. मग सर्व गोळ्यांचे चपात्या लाटून घ्या. जसजस तुम्ही चपात्या करत जाणार तसं तसं ते चपाती कपड्यांमध्ये झाकून ठेवा.
- 7
चपाती वरती लावण्यासाठी मिश्रण तयार करू. एका वाटीमध्ये 3 टीस्पून कॉर्नफ्लॉवर, 3 टीस्पून तूप घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण तयार
- 8
एका चपातीवर कॉर्नफ्लॉवर चे मिश्रण लावून त्यावर मैद्याचे पीठ शिंपडा. पुन्हा चपाती ठेवून त्यावर कॉर्नफ्लॉवर मिश्रण लावा वरून मैद्याचे पीठ शिंपडा.
- 9
असंच एकावर एक चपाती वर मिश्रण लावून. सर्वा चपाती तयार करा. एकावर एक चपाती ठेवल्याने चपाती जाड होईल. मग आपण त्या चपातीला लाटून घेऊ. लाटून झाल्यावर. त्या चपातीला घट्ट रोल करून घेऊ.
- 10
घट्ट रोल करून झाल्यावर. दोन्ही हाताने रोल पुन्हा एकदा थोडं पातळ करून घेऊ. रोल पातळ झाल्यावर त्याचे पीस करून घेऊ.
- 11
एका पिसाचा गोळा घेऊन. तळहाताच्या साहेने वरती प्रेस करा. आणि ते गोल लाटून झाल्यावर त्यात मिश्रण भरा. जसा आपण करंज्या बनवतो तसं बनवायचं आहे. आणि तुम्ही कचोरी, पेटीस पण बनू शकता. गोल आकार तयार करून घ्या. मग त्यात मिश्रण घालून. गोला आकार करून घ्या. तळहाताच्या साहेने गोल आकारला प्रेस करा.
- 12
3 आकाराचे पेटीस बनवले आहे. एक आहे गोल, एक आहे पॅटीस आकार, आणि एक आहे करंजीचा आकार, एका कढईत तेल गरम व्हायला ठेवा. तेल कोमट गरम झाल्यावर त्यात कचोरी सोडा. आणि ते ब्राऊन कलर होय पर्यंत तळून घ्या. स्लो गॅसवर.
- 13
तयार पफ पेटीस.
Similar Recipes
More Recipes









































टिप्पण्या (9)