इंदौरी पोहा (indori pohe recipe in marathi)

इंदौर च्या प्रत्येकाची सकाळ ची सुरुवात होते ती गरमागरम पोहा खाऊन. त्याबरोबर मस्त गरमागरम जलेबी. अगदीच काही जण तर दररोज आवडीने खातात.मी घरी नेहमीच्याच पद्धतीने बनविते. बाहेरूनच मागवतो परंतु covid 19 मुळे ६महीने खायला मिळाले नाही म्हणून आज बनवूनच पाहिले.खूपच छान झालेत.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे पाण्याने स्वच्छ धुवून पाणी काढून १० मि भिजवून घ्यावे
- 2
नंतर त्यात मीठ चवीनुसार हळद साखर धनापावडर आमचूर पावडर लिंबाचा रस घालून मिक्स करावे
- 3
गॅस वर एका पातेल्यात साधारण दोन इंच पाणी घ्यावे चाळनीत वरील मिश्रण ठेवून त्यावर झाकण ठेवून १०-१५मि वाफवून घ्यावे
- 4
एका छोट्या पॅन मध्ये तेल घालून तडक्याचे सर्वसाहित्य एक एक करून घालावे. एकदम गरमागरम वाफवलेल्या पोह्यावर टाकून मिक्स करावे
- 5
एका प्लेटमध्ये काढून सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)