इंदौरी पोहा (indori pohe recipe in marathi)

Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660

इंदौर च्या प्रत्येकाची सकाळ ची सुरुवात होते ती गरमागरम पोहा खाऊन. त्याबरोबर मस्त गरमागरम जलेबी. अगदीच काही जण तर दररोज आवडीने खातात.मी घरी नेहमीच्याच पद्धतीने बनविते. बाहेरूनच मागवतो परंतु covid 19 मुळे ६महीने खायला मिळाले नाही म्हणून आज बनवूनच पाहिले.खूपच छान झालेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ सर्विंग
  1. २ वाटीपोहे
  2. १ टीस्पून हळद
  3. 1 टीस्पूनधनापावडर
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  6. चवीनुसार मीठ
  7. 1/2लिंबाचा रस
  8. तडका लावण्यासाठी चे साहित्य
  9. ५-६ कडिपत्ता पाने
  10. 2हिरव्या चिरलेला मिरची
  11. १ टीस्पून जिरं
  12. १ टीस्पून मोहरी
  13. १ टीस्पून साबूत धने
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. 6-7शेंगदाणे
  16. १ टेबलस्पून शोप
  17. सजावटीसाठी साहित्य
  18. १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  19. किसलेला गाजर
  20. बारीक चिरलेला कांदा
  21. 2 टेबलस्पून रतलामी शेव

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम पोहे पाण्याने स्वच्छ धुवून पाणी काढून १० मि भिजवून घ्यावे

  2. 2

    नंतर त्यात मीठ चवीनुसार हळद साखर धनापावडर आमचूर पावडर लिंबाचा रस घालून मिक्स करावे

  3. 3

    गॅस वर एका पातेल्यात साधारण दोन इंच पाणी घ्यावे चाळनीत वरील मिश्रण ठेवून त्यावर झाकण ठेवून १०-१५मि वाफवून घ्यावे

  4. 4

    एका छोट्या पॅन मध्ये तेल घालून तडक्याचे सर्वसाहित्य एक एक करून घालावे. एकदम गरमागरम वाफवलेल्या पोह्यावर टाकून मिक्स करावे

  5. 5

    एका प्लेटमध्ये काढून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660
रोजी

Similar Recipes