बदाम ब्राउन (Almond Brownie recipe in marathi)
बदाम ब्राउन (Almond Brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य कप च्या सहाय्याने मोजून घ्यावेत.
- 2
केक टिन ला बटर लावून ग्रीस करून घ्यावे व त्या वर बटर पेपर लावून घ्यावा. एका वाटी मधे बटर आणि चॉकलेट टाकून घ्यावे. गॅस वर एका पातेल्यामध्ये पाणी टाकून उकळी येऊ द्यावी. त्या पाण्यावर बटर आणि चॉकलेट चे वाटी ठेवून बटर आणि चॉकलेट वितळवून घ्यावे. या पद्धतीला डब्बल बॉलिंग इफेक्ट म्हणतात.
- 3
चाळणीच्या मदतीने मैदा, पिठी साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर चाळून घ्यावे. नंतर त्या मधे वितळलेले बटर आणि चॉकलेट चे मिश्रण टाकून मिक्स करून घ्यावे. लागेल तसे थोडे - थोडे दुध टाकून छान बॅट र तयार करून घ्यावे.
- 4
गॅस वर मोठ्या आकाराच्या पातेल्यात रिंग ठेवून त्याला १० मिनीटे हाई फ्लेम् वर प्री हीट करून घ्यावे. बॅटर ग्रीस केलेल्या टिन मधे टाकून सारखे करून घ्यावे. तयार टिन प्री हीट केलेल्या भांड्यामध्ये ठेवून द्यावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर २५ मिनीटे बेक होऊ द्यावी. (साधारण २५ - ३५ मिनीटे लागतील). २५ - ३० मिनिटांनी टिन बाहेर काढून थंड होऊ द्यावा.
- 5
बदामाचे काप करून घ्यावेत. टिन थंड झाला की ब्राऊनी चे काप करून घ्यावे. त्यावर बदामाचे काप आणि चॉकलेट सिरप टाकून छान सजवून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या (3)