ताकातील पालक भाजी (takatil palak bhaji recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#लंच
#साप्ताहिक लंच प्लॅनर
#ताकातील पालक भाजी

ताकातील पालक भाजी (takatil palak bhaji recipe in marathi)

#लंच
#साप्ताहिक लंच प्लॅनर
#ताकातील पालक भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 -25 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 3 कपबारीक चिरलेला पालक
  2. 1/2 कपआंबट ताक
  3. 2 टेबलस्पूनतूरडाळ
  4. 2 टेबलस्पूनबेसन पीठ
  5. 5-6लसुण पाकळ्या
  6. 6-7हिरवी मिरची
  7. चवीनुसारमीठ
  8. आवश्यकतेनुसार पाणी
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनहिंग
  12. 3 टेबलस्पूनतेल
  13. 1-2लाल सुके मिरची
  14. 1 टीस्पूनठेचलेला लसूण
  15. 2 टेबलस्पूनकच्चे शेंगदाणे

कुकिंग सूचना

20 -25 मिनिटे
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धून तो बारीक चिरून घेणे. नंतर कूकरच्या डबा घेऊन त्यात तूरडाळ स्वच्छ धून घेणे. व त्यातच चिरलेला पालक घालावा. व शिजण्या पूरते त्यात पाणी घालावे. पालक छान कुकर मध्ये शिजवून घेणे.

  2. 2

    पालक शिजला कि त्यातील जास्तीचे पाणी काढून ठेवणे. व त्यात बेसन पीठ घालून ती भाजी एकदम बारीक डावाने हटून घेणे.

  3. 3

    वत्या हटून घेतलेल्या भाजी मध्ये आंबट ताक घालावे. व एकजीव करून घेणे.आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेणे. तसेच हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून ती चवीनुसार घालून घेणे. सगळे एकजीव करून घेणे. आता त्यात पालकाचे जास्तीचे पाणी घालून घेणे.

  4. 4

    आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि त्यात मोहरी, हिंग आणि हळद घालून खमंग फोडणी करून घेणे. या फोडणी मध्ये पातळ केलेला पालक घालावा. आवडत असल्यास 3 मोठे चमचे कच्चे शेंगदाणे ही घालावेत. या भाजीला 5-7 मिनिटे छान शिजवून घेणे.त्याला उकळी यायला लागली कि 2 मिनिट ठेवून गॅस बंद करावा.

  5. 5

    आता भाजी सर्व्ह करताना वरून तडका देऊन भाजी सर्व्ह करावी. तडका देण्यासाठी छोटी कढई मध्ये तेल घालावे तेल गरम झाले कि त्यात मोहरी, हिंग, हळद, ठेचलेला लसूण आणि लाल मिरची घालून खमंग फोडणी करून घेणे. ही फोडणी त्या भाजीवर घालावी.

  6. 6

    गरम गरम पोळी किंवा फुलके, भाकरी सोबत सर्व्ह करावी. खूप छान टेस्टी अशी पालकाची भाजी तयार होते.

  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes