मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)

Ashwinee Vaidya @cook_26089892
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून 4 तास पाण्यात भिजत घालावे. 4 तासानंतर पाणी काढून टाकावे व मिक्सरमधून डाळ, तांदूळ, आलं, लसूण व हिरवी मिरची घालून बारीक पातळसर वाटून घ्यावे.
- 2
वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालावा.
- 3
हिंग, हळद व तिखट घालावे.
- 4
मीठ व कोथिंबीर घालावी. मिश्रण एकजीव करून घ्यावे. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवावा. त्यावर थोडे तेल घालून पातळसर डोसा पसरवून घ्यावा.
- 5
डोसा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा.
- 6
गरमागरम मुगडाळीचा चिला हिरव्या चटणीबरोबर खायला द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14573987





















टिप्पण्या