बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)

#GA4
#week26
Keyword- orange
ह्या हलव्याला ,बदामी हलवा,सिंधी हलवा, दिसायला बरा सारखा दिसतो त्यामुळे याला रबर हलवा देखील म्हणतात.
दिसायला खूप आकर्षक आणि चमकदार पाहूनच खायची खूप इच्छा होते.
आम्हा तिन्ही भावंडांचा खूप फेवरेट आहे हा हलवा...😊😊
वेगवेगळ्या फ्लेवरमधे हा हलवा बनवला जातो. मी यामधे ऑरेंज ज्यूस वापरून हा टेस्टी हलवा बनवला आहे. ..😋😋
पाहूयात रेसिपी.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम संत्र्याचा ज्यूस काढून घ्या.
- 2
बाऊलमधे हा ज्यूस आणि काॅर्नफ्लोअर,कलर घालून छान मिक्स करून घ्या. बाजूला ठेवा.
- 3
कढईत साखर,पाणी एकत्र पाक तयार करा. पाक चिकट होत आला की त्यात वेलचीपूड,लिंबाचा रसघालून मिक्स करा.
काॅर्नफ्लोअरचे थोडे थोडे मिश्रण घालून व्हिस्करने मिक्स करत राहा. - 4
आच मंदच ठेऊन मिश्रण न थांबता सतत ढवळत राहावे. मिश्रण छान घट्टसर झाले की त्यात तूप घालावे. मिक्स करावे.
- 5
मिश्रण कढईतून सुटू लागले की समजावे हलवा तयार.यात तुम्ही सुका मेवा घालू शकता.
- 6
ग्रिसिंग टिनमधे हे मिश्रण ओतून नीट पसरवून घ्यावे. वरूनसुका मेवा चालून १ तास बाजूला ठेवावे.
- 7
नंतर त्याच्या वड्या पाडून टेस्टी हलवा सर्व्ह करावा...😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या