ऋषीपंचमी स्पेशल आमटी (Rushi Panchami Special Amti recipe in marathi)

या दिवशी आपल्या रोजच्या जेवणा पेक्षा वेगळे जेवण चालते.नावाप्रमाणेच पूर्वी ऋषीमुनी जसा आहार घ्यायचे तसे म्हणजे शेतात नांगरणी करून पिकविलेले धान्य व भाजीपाला चालत नाही तर घरी लागलेले भाजी व देवतांदूळ खाल्ले जातात.

कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ निवडून, धुवून भिजत घालावे.शक्यतो रात्री घालावे.वाल पण रात्री भिजवले.
- 2
वालाचे दाणे, कांदा, मोहरी हे कुंडीत लावले होते.धोप्याची पाने पण होती पण फोटो घ्यायचा विसरला.तांदुळ मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.वालाचे दाणे व पपई कुकर मध्ये वाफवले.
- 3
गंजात साजूक तूप घालून मिरची,मोहरी,कांदा घालून फोडणी करावी. पपई, दाणे,धोप्याची पाने बारीक चिरून सर्व साहित्य घालावे.उकळी आली की तांदूळ पेस्ट लावावी.घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे.वरुन लिंबाचा रस घालावा.
- 4
अशाच प्रकारे भात देखील करता येतो.खूप मस्त लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)