मटार भात (matar bhat recipe in marathi)

मटार भात (matar bhat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मटार भातासाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करून घ्यावी.
- 2
तांदूळ स्वच्छ धुवून 20मिनिटे बाजूला ठेवून द्यावा
- 3
आलं मिरची पेस्ट करून घ्यावी. कांदा चिरून घ्यावा.
- 4
गॅसवर कढई तापत ठेवावे. त्यात तेल घालावे. तेल तापले की जरा काजू तळून घ्यावा
- 5
आता त्याच जीरे हिंग आलं मिरची लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे.आता कांदा घालावा,कांदा जरा परतला की मटार घालावा सर्व सारखे परतून घ्यावे
- 6
मटार परतून झाला की त्यात धुवून ठेवलेला तांदूळ घालून सर्व परतावे
- 7
आता हळद घालावी,हळद घालून परतून झाले की, गोडा मसाला,गरम मसाला, कडीपत्ता. लाल तिखट चवीनुसार मीठ घालावे चांगले परतून घ्यावे
- 8
एका बाजूला गॅसवर पाणी उकळण्यास ठेवावे.एक वाटी भातास 2 वाट्या पाणी घ्यावे तांदूळ जुना असल्यास थोडे पाणी जास्त लागते.पाणी उकळले की भातात घालावे
- 9
पाणी घातल्यावर गॅस मोठा ठेवावा, पाच मिनिटांनी गॅस बारिक करावा, झाकण ठेवावे, पाच ते सात मिनिटांनी झाकण काढवे.आपला छान मटार भात तयार आहे.
- 10
सर्व्हिंग बाउल मधे मटार भात काढून वर खोबर कोथिंबीर,घालून तळलेले काजू घालून सजवू वर साजूक तुपाची धार सोडून खाण्यास घेवू.
Keywords
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या