उंधियु (undhiyu recipe in marathi)
#EB9 #W9
हिवाळ्याला सुरुवात झाली की प्रसिद्ध गुजराती उंधियु च्या भाज्या मार्केटमध्ये दिसायला लागतात. दरवर्षी या सीझनमध्ये किमान दोन वेळा तरी उंधियु केला जातो. उंधियो करण्याच्या अनेक पद्धती आहेत मी झटपट होणारी कुकर मधली उंधियोची रेसिपी आज दाखवणार आहे. या रेसिपीला वेळही कमी लागतो आणि तेलाचे प्रमाणही यांमध्ये कमी असते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी ही रेसिपी खूपच सोपी पडेल असे मला वाटते.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथीचे मुठिये करण्यासाठी एका भांड्यामध्ये मेथी, बेसन आणि वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेऊ नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्याचे हव्या त्या आकाराचे गोळे करून तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घेऊ.
- 2
आता सर्व भाज्या तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या. बटाट्याचे, केळ्याचे,कंदाचे थोड्या मोठ्या आकाराचे तुकडे करून घ्या. वांग्याचे मध्ये काप देऊन अर्धवट चार भाग करून घ्या. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये बटाटे,कंद,केळी, तुरीचे दाणे या सर्व भाज्या व्यवस्थित गुलाबी रंगावर तळून घ्या.
- 3
उंदियो चा हिरवा मसाला तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये नारळ,बारीक चिरलेली कोथिंबीर,आले मिरची आणि ओल्या लसणाची पेस्ट, हळद, तिखट, धना जिरा पावडर,पांढरे तीळ,ओवा, साखर आणि चवीनुसार मीठ, दोन टेबलस्पून तेल, लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. हा हिरवा मसाला चिरा दिलेल्या वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्या आणि ती वांगी तेलावर शॅलो फ्राय करून घ्या.
- 4
सुरती पापडीला भाजी करण्याआधी थोडेसे मीठ,चिमूटभर खायचा सोडा, थोडासा ओवा आणि पाव चमचा हळद हे मिश्रण लावून अर्धा तास बाजूला ठेवून द्या. उंदियो करताना कुकर मध्ये तीन ते चार टेबल्स्पून तेल त्यामध्ये थोडेसे जीरे हिंग ओवा यांची फोडणी करून प्रथम सुरती पापडी त्या तेलामध्ये तीन ते चार मिनिटे परतून घ्यावी (तुम्हाला हवे असेल तर या सुरती पापडी ला आधी कुकरमध्ये एक शिट्टी काढून वापरू नये घेऊ शकतो) नंतर त्यावर कंदाचा केळ्याचा असे एक एक थोर लावत जावेत आणि मधे मधे थोडा हिरवा मसाला पसरवा.
- 5
सर्वात वर भरलेली वांगी आणि मेथीचे मुठीये ठेवून, अर्धा कप पाणी घालून कुकर बंद करावा आणि झाकण लावून मंद आचेवर वीस ते पंचवीस मिनिट भाजी शिजू द्यावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या