ताकपीठ (Taakpith recipe in marathi)

#AA
पदार्थ सोपा,साधा,पटकन होणारा,चवीलाही आंबट रुचकर,कधीतरी वाटतं आज ताकपिठ करूया.आज मी केलेय तकपिठ
ताकपीठ (Taakpith recipe in marathi)
#AA
पदार्थ सोपा,साधा,पटकन होणारा,चवीलाही आंबट रुचकर,कधीतरी वाटतं आज ताकपिठ करूया.आज मी केलेय तकपिठ
कुकिंग सूचना
- 1
ताकपिठ करताना,तांदळाचे पीठ जरा भाजून घ्यावे.
- 2
पिठ गार झाल्यावर ताका मध्ये मिक्स करून रवीने छान घुसळून घ्यावे.त्यामुळे गुठळी राहत नाही.आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यावे.
- 3
आता कढई तापत टाकून त्यात तेल तापले की त्यात मोहरी,हिंग,कढीपत्ता,मिरच्या,हिंग,घालून परतून घ्यावे.आता त्यात चिरलेला कांदा घालावा,वर थोडी हळद मीठ साखर घालून परतून घ्यावे.कांदा छान परतला गेला की त्यात,आपण तयार केलेले पीठ त्यात घालावे
- 4
चांगले मिश्रण हलवून घ्यावे.वर झाकण ठेवून वाफ आणून घ्यावी.
- 5
छान वाफ आली शिजले की डिश मध्ये खाण्यास घ्यावे.वर तेल घालावे कोथिंबीर घालून खाण्यास घ्यावे.आंबट रुचकर ताकपिथ तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या