अंडा करी एकदम झणझणीत (anda curry recipe in marathi)

आज संडे आणि संडे म्हटले की घरी नॉनव्हेज असलेच पाहिजे पण आज नॉनव्हेज न्हवते तर त्याला पर्याय म्हणजे अंडा करी आणि ते ही झणझणीत पाहिजे सर्वांना म्हणून सर्वांना आवडेल अशी ही अंडा करी बनवली

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कांदे कापून घ्यावे आता कढई गरम करायला ठेवावे व 1 टेबलस्पून तेल घ्यावे तैल गरम झाले की त्यात कांदे टाका कांदे थोडे झाले की मसाले पूर्ण टाका धने व छान परतून घ्या कांदा गोल्डन होई पर्यंत
- 2
आता हा मसाला मिक्सर क्या पॉट मधे काढा व भरपूर कोथिंबीर वाटी भर तरी सोबत वाटा
- 3
आता कढईत 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवा, व वाटलेला मसाला टाका व परतावत रहा, आले लसूण पेस्ट टाका व तेल सुटे पर्यंत परतत रहा आता तेल सुटलेले आहे मसाल्यात
- 4
आता मसाल्यात तिखट हळद टाकून परतवा थोडे पाणी टाकून मोठ्या गॅस वर अजुन मसाला छान परतावा
- 5
पाणी उडाले की त्यात आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तेवढे पाणी घालून टाका मी 2 ग्लास पाणी टाकले आता छान मीठ टाकून उकळू द्या
- 6
अंडे उकळायला ठेवा 15 मिनिट आणि सोलून ठेवा एका कढईत एक टेबलस्पून तेल गरम करा व त्यात थोडी हळद टाका व हे अंडे त्यात फ्राय करा
- 7
आता काट्या चा चमचा ने अंड्याला टोचावे व अंडे ग्रेव्ही मधे सोडा वरून गरम मसाला टाका थोडे 2,3 मिनिट उकळी येवू द्या व कोथिंबीर टाकून गॅस बंद करा
- 8
चला तर या मग आणि बसा
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या