विंटर हेल्दी टिक्की (Winter Healthy Tikki Recipe In Marathi)

#WWR
हिवाळ्यात भूक जास्त लागते . अशावेळी इतर कांहीतरी खाण्यापेक्षा , पौष्टिक व हलके अन्न खाल्ल्यास ते प्रकृतीस मानवते . 3 - 4 प्रकारची पिठं ,भाज्या , तीळ सर्वच घटक पोषक !! अशा पोषक घटक युक्त , टिक्क्या बनविल्यात .या मस्त व खमंग लागतात .
चला त्याची कृती पाहू

कुकिंग सूचना
- 1
मेथीभाजी,पालक व कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
सगळी पिठं परातीत घेऊन, त्यांत भाज्या, हळद, तिखट,धने जीरे पूड,मीठ, हिंग ओवा(चोळून) व दोन टीस्पून मोहन टाका.
हे मिश्रण छान एकत्रित करा. थोडे थोडे पाणी टाकत, त्या पिठाचा गोळा बनवा.
त्या गोळ्याचा रोल (उभा) बनवा. - 2
गॅसवर कढईत पाणी तापत ठेवा. त्यावर रिंग ठेवून त्यावर जाळीची प्लेट ठेवा. प्लेटला तेलाने ग्रीसिंग करा. त्या पिठाचा रोल त्या जाळीवर ठेवून 12 ते 15 मिनिटे वाफ येऊ द्या. वाफलेल्या रोलमध्ये, टूथ पिक टोचून, वाफल्याची खात्री करा.
रोल दुसऱ्या प्लेटमध्ये काढून, थोडासा गार झाल्यावर, त्याच्या पातळ चकत्या करा. - 3
गॅसवर कढईत तेलाची फोडणी ठेवा. त्यांत हिंग, मोहरी, जीरे, तीळ, लाल मिरची व कढीपत्ता टाकून,खमंग फोडणी करा. त्यांत चकत्या टाकून, हलक्या हाताने खालीवर परतवून 2 - 3 मिनिटे खरपूस होऊ द्या.
तयार टिक्क्या गरम गरम सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या