मेथीचे थेपले (Methiche Theple Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#WWR #विंटर रेसिपीज.... हिवाळ्या त बाजारामध्ये खूप सुंदर हिरवी मेथी मिळते आणि ते आरोग्यासाठी अगदी उत्तम असते ....तर त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवू आपण हिवाळ्यामध्ये खायला हव्यात म्हणून मी आज झटपट मेथीचा ठेपला बनवलेला आहे ....जे गुजराती लोक बनवतात तसा बनवलाय एकदम सॉफ्ट आणि सुंदर चवीला लागतोय प्रवासामध्ये किंवा मुलांना डब्यात द्यायला सकाळी नाश्त्याला सुद्धा चांगला असतो..... हा दोन दिवस एकदम सॉफ्ट आणि छान मुलायम पण राहतो......हे चटणी साॅस लोणचे याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30- मीनीटे
4 -जणांसाठी
  1. 250 ग्रामहिरवी मेथी
  2. 50 ग्रामकोथिंबीर
  3. 3 कपगव्हाचे पीठ
  4. 1 कपबेसन
  5. 2-3 टेबलस्पूनदही
  6. 2 टेबलस्पूनतेल मोहन
  7. 1 टेबलस्पूनतीखट
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनओवा
  10. 1 टेबलस्पूनतीळ
  11. 1 टीस्पूनधणेपूड
  12. 1 टेबलस्पूनमीठ टेस्ट नूसार
  13. 4-5 टेबलस्पूनतेल वरून लावायला

कुकिंग सूचना

30- मीनीटे
  1. 1

    प्रथम मेथी स्वच्छ धुऊन पूर्ण पाणी निथळून बारीक चिरून घेणे तसेच कोथिंबीर पण धून चिरून घेणे... एका बाऊलमध्ये मोठ्या कणीक आणि बेसन टाकणे त्यात सगळे मसाले टाकणे.‌..

  2. 2

    ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकणे म्हणजे छान फ्लेवर येतो नंतर त्यात मीठ आणि तेल टाकणे...

  3. 3

    दही टाकणे... आणि हाताने सगळं छान मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकत त्याचा एक साधारण घट्ट गोळा भिजवून घेणे

  4. 4

    भिजलेला गोळा पाच मिनिटांसाठी झाकून ठेवणे..... नंतर भिजलेल्या गोळ्याचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटणे आणि एखाद्या झाकणांनी गोल कट करून घेणे म्हणजे सगळे एकसारखे ठेपले तयार होतील..... गॅसवर तवा गरम करून त्यावर लाटलेला ठेपला टाकणे‌......

  5. 5

    एका साईडने थोडासा झाला की त्याला पलटवणे आणि नंतर दोन्हीकडून तेल लावून त्याला थोडासा चटके बसेपर्यंत अलट पलट करत शेकून घेणे.... अशाच प्रकारे सगळे मेथीचे ठेपले तयार करून घेणे.... चटणी सास किंवा लोणच्या सोबत गरमागरम सर्व्ह करणे.....

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes