झटपट कोकणी घावन

#NVR
कोकण म्हटले की डोळ्यासमोर दाट हिरवीगार झाडी दिसते. भरपूर प्रमाणात पाऊसही असतो. तिथे तांदळाचे पीक प्रामुख्याने जास्त येते. तांदळापासून अनेक पदार्थ बनवतात. त्याच पैकी एक झटपट कोकणी घावन. कोकणात कुणी पाहुणे आले तर हमखास झटपट होणारे घावन तयार करतात. अत्यंत कमी वेळात व कमी सामग्रीत गरमागरम घावन तयार केले. चटणी बरोबर अत्यंत चविष्ट लागतात. काय सामग्री लागते ते पाहूयात...

Steps
- 1
प्रथम तांदळाच्या पिठात चवीपुरते मीठ टाका. पिठाच्या दुप्पट पाणी हळूहळू टाका व मिश्रण ढवळून घ्या. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. पीठ छान सरसरीत होते. घावन बनवण्यासाठी कन्सिस्टन्सी अशीच पाणीदार असते.
- 2
गॅसवर निर्लॅपचा किंवा बिडाचा तवा ठेवा. एक चमचा तेल टाकून पसरवून घ्या. नंतर पळीने मिश्रण चांगले ढवळून घ्या.मिश्रण प्रथम बाहेरच्या बाजूस टाका नंतर मध्यभागी टाकून दोन मिनिटे झाकून ठेवा. छान जाळी पडते. झाकण काढून ते उलटवून पुन्हा एक मिनिट ठेवा. आपले झटपट कोंकणी घावन तयार.... अशाप्रकारे सर्व घावन तयार करून घ्या..
- 3
चटणी - ओल्या नारळाचा कीस, डाळे, शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता चवी पुरते मीठ टाकून मिक्सरवर फिरवून घ्या. गॅस वर कढल्यात तेलाची फोडणी ठेवा, त्यात मोहरी, जिरे, हिंग टाकून खमंग फोडणी चटणीवर टाका. आपली हिरवी चटणी तयार...
- 4
सकाळी न्याहरीच्या वेळेस गरमागरम घावन त्याबरोबर हिरवी चटणी सर्व्ह करा. कमी साहित्यात व कमी वेळात झटपट अशी रेसिपी बनते. सर्वजण आवडीने त्याचा आस्वाद घेतात. चला तर मैत्रिणींनो तुम्हीही नक्कीच आस्वाद घ्या.
Similar Recipes
More Recipes
-

Santy Coy
-

Shobha Rathod
-

Sarvat Hanif
-

Hiroko Liston
-

Hiroko Liston
-

Hiroko Liston
-

Instant Pot Korean Sweet Brown Sugar Potatoes
Elyna Ottawa -

Hiroko Liston
-

Boursin Beef Stroganoff Crockpot
Maggie Conlon
-

Kumkum Chatterjee
-

fenway
-

PittbullMom2014
-

leighbcook@yahoo.com -

Taylor Topp Comacho
-

Archana Devi ( Chaurasia)
-

Anna.T
-

Mpova Jeancy
-

Stir-fried Squid with Salted Egg Yolk
Pakprawee
-

Bengali style Chicken aloo jhol
Susmita Patnaik
-

Meme
-

Jantullu'sbakery
-

Munvi

Comments (8)