सॅन्डविच ढोकळा (Sandwich Dhokla Recipe In Marathi)

सॅन्डविच ढोकळा (Sandwich Dhokla Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
पाणी, तेल, मीठ, साखर, हिंग आणि चिमूटभर हळद. मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
- 2
त्यात बेसन घालून परत मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
- 3
तयार झालेले बॅटर दहा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्यात बेकिंग सोडा घालून फेसून घ्यावे.
- 4
वाट्याना तेल लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओतावे.
- 5
एका भांडयात पाणी घालून त्यावर चाळणी ठेवून त्यात मिश्रणाने भरलेल्या वाट्या ठेवून वरून झाकण ठेवावे. दहा ते बारा मिनिटे मध्यम आचेवर ढोकळा वाफवून घ्यावा.
- 6
ढोकळा थंड होई पर्यंत फोडणी तयार करून घ्यावी. एका कढईत तेल घालून त्यात राई घालून ती तडतडल्यावर त्यात हिंग व पाणी घालावे त्यात लिंबाचा रस आणि साखर घालून दोन मिनिटे उकळवून घ्यावे..
- 7
थंड झालेले ढोकळे मधून कापून त्यावर तयार केलेली फोडणी पसरवावी.
- 8
ढोकळ्याच्या एका बाजूला चटणी लावून घ्यावी.
- 9
चटणी लावलेल्या बाजूवर ढोकळ्याचा दुसरा भाग ठेवावा. वरून सॉस लावावा त्यावर बारीक शेव व डाळिंबाचे दाणे घालून सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या