वडापाव (vada pav recipe in marathi)

#स्ट्रीटफुड .... पाऊस असेल तर अजून मजा यायची चहा आणि गरम-गरम वडापाव वा ! वा !
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्ट्रीटफुड .... पाऊस असेल तर अजून मजा यायची चहा आणि गरम-गरम वडापाव वा ! वा !
कुकिंग सूचना
- 1
उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या.मिरच्या लसूण पाकळ्या पेस्ट करून घ्या. एका छोट्या पॅनमध्ये तेल तापवून मोहरीची फोडणी करून त्यात ती हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट खमंग परतून घ्या. आणि बटाट्यात खमंग फोडणी ओता. आता यात हळद लिंबाचा रस आणि मीठ घालून एकत्र करून घ्या. चव बघून मीठ मिरचीचे प्रमाण वाढवा. आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून ठेवा.
- 2
कढईत तेल तापवायला ठेवा. वड्याच्या कव्हर साठी बेसन घेऊन त्यात हळद, मीठ आणि बेताबेताने पाणी घालून एकजीव करा. मिश्रण जास्त पातळ किंवा खूप जाड नको गरजेनुसार पाणी घाला. मिश्रणात एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला म्हणजे कव्हर कुरकुरीत होईल
- 3
आता तेल तापलेल्या कढईत मिश्रणात बटाट्याचा गोळा बुडवून तेलात सोडा वडे सोडायच्या आधी बोटाने मिश्रणाचा छोटा थेंब तेलात टाका तो लगेच तळून आला की तेल तापले असे समजावे. छान गोल्डन रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. पावा मध्ये पुदिना चटणी आणि लाल तिखट चटणी घालून वडापाव खायला द्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes








टिप्पण्या