भगरीचा केशरी साखर भात (bhagricha kesar sakhar amba recipe in marathi)

Sandhya Deshmukh @4567vijayd
#cpm6
# उपवास रेसीपी
भगरीचा केशरी साखर भात (bhagricha kesar sakhar amba recipe in marathi)
#cpm6
# उपवास रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भगर स्वच्छ धूवून चाळणीमध्ये निथळत ठेवा.दुध गरम करून घ्यावे.अर्धी वाटी दुधामध्ये केशर घालून ठेवावे..पाणी गरम करून घ्यावे.
- 2
कढईत तूप गरम करावे.हा भात भरपुर तुपात करावा,छान लागतो.तूप गरम झाल्यावर लवंगा घालून,भगर घालून मंद गॅसवर खमंग भाजून घ्यावे.नंतर गरम दुध व पाणी मिक्स करून घालावे..गरज असेल तर जास्त पाणी वापरावे.चिमुटभर मीठ घालावे.व भगर मऊ शिजवून घ्यावी.
- 3
भगर शिजल्यानंतर त्यात साखर टाकायची..आवडीप्रमाणे साखर कमीजास्त करू शकता.साखर छान मिक्स करून घ्यायची.केशर मिश्रित दूध व कींचित फुड कलर घालावा.ड्रायफ्रूटस् व खोबरा कीस घालायचे.विलायची पुड घालायची.छान मिक्स करून मंद गॅसवर वाफ आणून घ्यायची..
- 4
आपला सुंदर, चविष्ट भगरीचा केशरी साखरभात तयार आहे...ड्रायफ्रूटस् आणि केशर काड्यांनी सजवून सर्व्ह करा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15314123





टिप्पण्या