बासुंदी (basundi recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#gpr
गुरूपौर्णीमा हा दिवस म्हणजे आपल्या गुरूंचे आभार मानण्याचा दिवस. गुरूंचा ऋणातून आपण कधीच उतराई नाही होऊ शकत.परंतु आपल्या समाधानासाठी त्यांना नैवेद्य दाखवायला मी ही बासुंदी केली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

बासुंदी (basundi recipe in marathi)

#gpr
गुरूपौर्णीमा हा दिवस म्हणजे आपल्या गुरूंचे आभार मानण्याचा दिवस. गुरूंचा ऋणातून आपण कधीच उतराई नाही होऊ शकत.परंतु आपल्या समाधानासाठी त्यांना नैवेद्य दाखवायला मी ही बासुंदी केली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 जणांसाठी
  1. 1 लिटरफुल फॅट दूध
  2. 1/2 चमचाविलायची पावडर
  3. 1 चमचाचारोळी
  4. आवडीनुसार सुकामेवा
  5. 1 कपसाखर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    अगोदर दूध जाड बुडाच्या कढईत किंव्हा पसरट भांड्यात आटवण्यासाठी ठेवावे. त्यात 1 चमचा घालून ठेवावा.बाकीचे साहित्य जमवून घेणे.

  2. 2

    दुधाला उकळी आली की अधून मधून दूध ढवळत राहावे. दूध बुडाला लागू नये म्हणून सतत ढवळावे. कढईचा बाजूला लागलेली साय खरडून आत टाकावी.
    साधारण निम्मे आटले की आता त्यात साखर घालावी. अजून थोडे आटऊन घ्यावे किंव्हा आपल्या आवडीनुसार जास्त आटवावे. सुकामेवा घालावा.आता दूध खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे. सतत ढवळावे.

  3. 3

    आता तयार आहे आपली बासुंदी ती आपण पुरी,चपाती किंव्हा तशीच सुद्धा खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes