भगरीचे वडे (bhagriche vada recipe in marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#gpr
गुरुपौर्णिमा व शुक्रवार चा उपवास चा मेळ घालून केलेली चटपटीत पाककृती. उपवासाला नेहमीचे तेच ते प्रकार होतात म्हणून काही तरी चटपटीत करण्याचा अट्टाहास.

भगरीचे वडे (bhagriche vada recipe in marathi)

#gpr
गुरुपौर्णिमा व शुक्रवार चा उपवास चा मेळ घालून केलेली चटपटीत पाककृती. उपवासाला नेहमीचे तेच ते प्रकार होतात म्हणून काही तरी चटपटीत करण्याचा अट्टाहास.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपभिजवलेला साबुदाणा
  2. 1 कपशिजवलेली तिखट भगर
  3. 1/2 कपशिंगाडा पीठ
  4. 1/2 कपभगर पीठ
  5. 1मोठा उकडलेला बटाटा
  6. 3 टीस्पून आले मिरची कोथिंबीर पेस्ट
  7. मीठ चवीनुसार
  8. साजुक तूप तळण्यासाठी
  9. चिंच खजूर चटणी
  10. दह्याचा रायता
  11. सर्व्हींग साठी:
  12. कोथिंबीर
  13. 1 टीस्पून जीरे

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    साबुदाणा धुऊन 4-5तास भिजवून ठेवा. शेंगदाणे भाजून सोलून मिक्सर मधून भरडून कुट करणे. मिक्सर जार मधे 4 मिरच्या, 1" आले, व कोथिंबीर वाटून घ्यावे

  2. 2

    भगर धुऊन रोवळून घेणे. एका भांड्यात भगर 2 टि स्पून शेंगदाणे कुट, 1 टि स्पून मिरची पेस्ट, मीठ व आवश्यक तेवढे पाणी घालून भगर शिजवून घ्या.

  3. 3

    बटाटा उकडून सोलून फोडी करून घेणे. एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा, शिजवलेली भगर, भगरीचे व शिंगाडा पीठ, बटाटा, आले मिरची पेस्ट कोथिंबीर, मीठ, जीरे शेंगदाणे कुट घालुन मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे छोटे गोळे करून ते चपटे करून मधे बोटाने होल करून घेणे.

  4. 4

    एका कढईत तूप गरम करून त्यात वडे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर खमंग तळून घ्यावे. दह्यामधे तिखट मीठ चवीनुसार साखर व कोथिंबीर घालून रायता तयार करणे.

  5. 5

    गरमा गरम वडे चिंच खजूर चटणी व दह्याच्या रायता बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes