उपवासाचा क्रिस्पी डोसा (Upwasacha Crispy dosa recipe in marathi)

Yadnya Desai @Kitchen_Yadnya
उपवासाचा क्रिस्पी डोसा (Upwasacha Crispy dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावे व मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करून घ्यावी
- 2
ह्या पेस्ट मध्ये उपवास भाजणी, वाटलेलं आलं व हिरव्या मिरच्या, जीरे व मीठ घालावे. गरजेनुसार पाणी घालून डोसा बनवतो तेवढा पातळ घोळ तयार करावा.
- 3
डोसा तवा गरम करत ठेवावा. गरम झाल्यावर त्यावर ब्रशने तेल किंवा तूप लावावे व डोसा टाकतो तसा घोळ टाकून पसरावा.
- 4
5-7 मिनिटांनी डोसा चेक करावा. कडा सोडल्या असल्यास कालथ्याने उलटून दुसऱ्या बाजूने पण खरपूस करून घ्यावा.
- 5
शेंगदाण्याच्या चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16025169











टिप्पण्या