अळुची आमटी (Aluchi Amti Recipe In Marathi)

#अळुची आमटी
श्रावणामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या बाजारात येत असतात,त्यातलीच एक महत्त्वाची म्हणजे सदा अळू. श्रावणी सोमवार म्हणजे हमखास आळूच्या पानांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती. अळूच्या पानाच्या वड्या, शिरवळ्या, अळूचे फदफदे, अळूच्या पानांच्या गाठीची भाजी अशा वेगवेगळ्या रेसिपीज असतात आणि त्या श्रावण महिन्यात खाण्यास खूपच छान लागतात कारण ऐन पावसात अळूला खूप चांगली चव असते.

Steps
- 1
प्रथम आळूची पानं स्वच्छ धुऊन घ्यावी त्याचे देठ सोलून घ्यावेत आणि अळू बारीक चिरून घ्यावा देठाचे दोन दोन इंचाचे तुकडे करून ठेवावे.
- 2
कुकरमध्ये प्रथम भिजवलेले चणाडाळ आणि शेंगदाणे टाकून त्यावर आळूची पानं आणि देठ ठेवावे,आवश्यकतेनुसार मीठ घालावे आणि दोन शिट्या काढून घ्याव्यात.
- 3
नंतर नेहमीप्रमाणे कढईत तेल गरम करून राई आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून त्यावर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा नंतर त्यात हळद तिखट घालून वरून शिजवलेले अळू चणाडाळ आणि शेंगदाणे हे त्यावर टाकावे.आवश्यकतेनुसार मीठ व चिंचेचा कोळ आणि गूळ घालून व्यवस्थित उकळून घ्यावे.
- 4
उकळ आल्यानंतर त्यावर खवलेले ओल्या नारळाचे खोबरे घालून दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. आणि झाले तयार अळूची फदफदे.गरम गरम भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर अतिशय चविष्ट लागते.
Similar Recipes
More Recipes
-

Cluelesskitty
-

Bina Anjaria
-

Soft Pancakes for a Slow Morning 🥞
AllDay Meal
-

Deepa Rupani
-

Bhavnaben Adhiya
-

Bernal
-

family style
-

Dancerchef 🩰
-

skunkmonkey101
-

skunkmonkey101
-

AddaBaita -

Priya Chiripal
-

Meenxi Mandaliya
-

पंजाबी समोसा (Punjabi Samosa Recipe In Marathi)
Anushri Pai
-

Mamta Pandya
-

Rahimah Yusuf -

California Farm No Sugar Grape Jelly
Hobby Horseman
-

Savory Cheedai (Uppu Cheedai in Tamil)
Lakshmi Sridharan Ph D
-

Hajjo's Cuisine
-

Hiroko Liston

Comments