पंजाबी समोसा (Punjabi Samosa Recipe In Marathi)

#BRR
नाश्ता म्हटलं की खूप काही पदार्थ असतात. पण काही पदार्थ फक्त बाहेरच खाल्ले जातात. पण जर त्यांची चव आपण घरातही करू शकलो तर ती नक्कीच सर्व कुटुंबाला आवडेल. आणि अर्थातच हायजेनिक पण असेल म्हणूनच सर्वांचा आवडीचा असा पंजाबी समोसा आज आपण बनवून बघूया.
पंजाबी समोसा (Punjabi Samosa Recipe In Marathi)
#BRR
नाश्ता म्हटलं की खूप काही पदार्थ असतात. पण काही पदार्थ फक्त बाहेरच खाल्ले जातात. पण जर त्यांची चव आपण घरातही करू शकलो तर ती नक्कीच सर्व कुटुंबाला आवडेल. आणि अर्थातच हायजेनिक पण असेल म्हणूनच सर्वांचा आवडीचा असा पंजाबी समोसा आज आपण बनवून बघूया.
Steps
- 1
प्रथम मैदा चाळून त्यामध्ये मोहन साठी घेतलेले साजूक तूप थोडे गरम करून घालावे. त्याचप्रमाणे ओवा हातावर चोळून टाकावा. मीठ चवीप्रमाणे घालावे. हे सर्व मैद्याला नीट चोळून घ्यावे. मूठ दाबली असता मैदा मुठीच्या आकारात घट्ट राहिला पाहिजे, इतकं मोहन आवश्यक असतं, त्यामुळे समोस्याचे कव्हर खुसखुशीत होते आणि हे सर्व घट्टसर मळून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
समोशातील सारणासाठी सर्वप्रथम प्रत्येकी एक एक चमचा घेतलेले धने जीरे बडीशेप आणि अनारदाना हे सर्व त्यामध्ये थोडे परतून मिक्सरला जाडसर वाटून घ्यावे.
- 3
उकडलेले बटाटे आणि शिजवलेले मटार दाणे एकत्र करून थोडेसे मॅश करावे.
पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यात पाव चमचा हिंग, वाटलेले आले लसूण मिरचीचे वाटण चांगले परतून घ्यावे त्यामध्ये जाडसर पावडर केलेले धने जिरा अनारदाणे आणि बडीशेप यांची पावडर घालावी त्यावर थोडी हळद आणि लाल तिखट घालावे. त्यानंतर मटर आणि बटाटे घालावे जरुरीप्रमाणे मीठ घालावे थोडी आमचूर पावडर घालावी आणि सर्व नीट परतून घ्यावे जरूर वाटल्यास वरून थोडासा लिंबू रस टाकावा आवडत असल्यास अर्धा चमचा साखर टाकावी व सारण कोरडं करून घ्यावे. - 4
समोशातील सारण थंड होईपर्यंत मैद्याच्या मध्यम आकाराच्या गोळ्या करून जाडसर अशा पोळ्या लाटून घ्याव्यात. प्रत्येक पोळीचे चार याप्रमाणे चतकोर कापून ठेवावेत.
- 5
त्यानंतर फोटो दाखवल्याप्रमाणे एका चतकोराच्या दोन सरळ बाजू एकमेकांना चिकटवून आत मध्ये सारण भरून खालचा गोलाकार भाग त्या समोस्याच्या बेस मध्ये दुमडून घ्यावा. सर्व बाजु व्यवस्थित दाबून उभे असलेले समोसे नंतर गरम झालेल्या तेलात सोडावे आणि छान तांबूस रंगात तळून घ्यावे आणि हिरव्या चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
-

🪈🪈🙏🏾🙏Vrat Friendly Lauki Halwa🪈🪈🙏🏾🙏 (With Singhara Atta)
Bina Samir Telivala
-

Oyster design desiccated coconut sandesh
Barnali Debdas
-

Soumini Bhattacherjee
-

Seema Sharma
-

Radhika Shaparia
-

Tina
-

Keshma Raichura
-

Amrita Chakroborty
-

Shrikhand Sandesh Sandwich Dessert
Bethica Das
-

Aishwarya Kitchen A
-

family style
-

Dancerchef 🩰
-

skunkmonkey101
-

skunkmonkey101
-

Neha Rakholiya
-

Lizy Stewart
-

AddaBaita -

Priya Chiripal
-

Meenxi Mandaliya
-

Mamta Pandya
-

अळुची आमटी (Aluchi Amti Recipe In Marathi)
Anushri Pai
-

Rahimah Yusuf -

California Farm No Sugar Grape Jelly
Hobby Horseman
-

Savory Cheedai (Uppu Cheedai in Tamil)
Lakshmi Sridharan Ph D
















Comments