रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५- २० मिनिटे
  1. १/२ लीटर दूध
  2. १ कप दूध पाउडर
  3. १ कप साखर
  4. १ चमचा खवा
  5. १ कप कंडेन्स मिल्क
  6. १ टीस्पून वेलची पाउडर
  7. ९- १० सुकवलेल्या कलिंगडाच्या बिया
  8. १ चमचा साइट्रिक ऍसिड
  9. आवश्यकतेनुसार साजूक तूप

कुकिंग सूचना

१५- २० मिनिटे
  1. 1

    १/२ लीटर दूधाला ऊकळ आल्यानंतर, त्यात १ चमचा साइट्रिक ऍसिड घालून दूधाला फाटून द्या. छान फाटल्यानंतर थंड होऊन द्या आणि गाळून पनीर तैयार करून घ्या.

  2. 2

    पॅन मध्ये २ चमचे साजूक तूप वितळवून घ्या. त्यात पनीर घाला. मंद आचेवर परतत रहा आणि पनीर मधले पाणी सुकून द्या. मग त्यात घाला १ कप दूध पाउडर आणि १ कप साखर.

  3. 3

    साखर विरघळल्यानंतर त्यात घाला १ चमचा खवा, १ कप कंडेन्स मिल्क आणि १ टीस्पून वेलची पाउडर. गोळा तैयार होऊन पॅन सोडून देईपर्यंत मिश्रण मंद आचेवर ढवळून घ्या. मग गॅस वरून मिश्रण उतरवून घ्या.

  4. 4

    एका चौकोनी भंडयाला साजूक तूप लावून घ्या आणि मिश्रण गरम असतांनाच त्यात ओतून पसरवून घ्या. थंड होऊन द्या.

  5. 5

    थंड झाल्यावर भांड्यातून काढून घेऊन कलाकंदचा चौकोनी अकार द्या. चांदीचा वर्ख आणि सुकवलेल्या कलिंगडाच्या बिया लावून सजवून घ्या आणि सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Lekha Toraskar
Lekha Toraskar @cook_16009462
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes