विरार-आगाशी-अलिबागचे पोहा-चिकन भुजिंग

Sneha Chaudhari_Indulkar
Sneha Chaudhari_Indulkar @angelscharm
Virar And Saphale

विरार-आगाशी-अलिबागचे पोहा-भुजिंग ही इथल्या ठिकाणची favorite आणि signature dish! :)
विरार ला आलात कि आवर्जून आगाशीच्या 'आगाशी भुजिंग सेंटर' या पिढीजात उत्तम दर्जाचे भुजिंग बनवणा-या सेंटर ला भेट देऊन वेगवेगळ्या भुजिंगचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
ग्रिल चिकनच्या फ्लेवरमधे मुरलेले हे तिखटसर पोहे भुजिंग स्टार्टर म्हणून एक वेगळा आणि तेवढाच चमचमीत पदार्थ आहे. पोहे तर आपल्यापैकी बहुतेकांना आवडतात, पण भुजिंगसारख्या मसालेदार स्वरूपात ते अफलातून चवदार लागतात. काळेमिरेचा फ्लेवर जास्त असतो. पाहुणे आले किंवा एखाद्या कार्यक्रमाला तोंडी लावण्यासाठी पोहे-चिकन भुजिंगचा बेत ठरवून करू शकता. :)
ब-याच वेगवेगळ्या पध्दतीने आणि निरनिराळे मसाले वापरून पोहा-चिकन भुजिंग बनवतात. आज मी आम्ही कसे बनवले ती पाककृती देत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाल्याचे आणि तिखटाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

४ ते ५
  1. चला तर मग पाहुया कसे बनवायचे घरच्या घरी चमचमीत ग्रिल्ड पोहा-भुजिंग!
  2. साहित्य:
  3. १. अर्धा किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे
  4. २. दोन ते तीन बटाटे मध्यम आकाराचे
  5. ३. दोन कांदे बारीक चिरून
  6. ४. पातळ पोहे: तीन ते चार मुठी (पोह्यांसाठी वापरतात ते)
  7. ५. कोथिंबीर बारीक चिरून एक मोठी वाटी
  8. ६. एका मोठ्या लिंबू चा रस
  9. ७. तेल: थोडे जास्तच लागते
  10. ८. दही (एक वाटी) हे ऐच्छिक आहे. मुळ रेसिपी मधे सहसा वापर होत नाही
  11. ९. वाटण: दोन हिरव्या मिरच्या + सात-आठ लसूण पाकळ्या + दीड इंच आले + थोडीशी कोथिंबीर ह्यांना बारीक वाटून घ्या
  12. १०. कढीपत्ता (ऐच्छिक)
  13. मसाल्याचे पदार्थ:
  14. १. काळे मिरे: दीड टिस्पुन
  15. २. जीरे: एक टिस्पुन
  16. ३. दालचिनी: तीन-चार लहान तुकडे
  17. ४. लवंग: ८-१० लवंगा
  18. ५. तमालपत्र: दोन ते तीन
  19. 1चमचा ६. सेलम हळद पावडर:
  20. ७. धणे: अर्धा टिस्पून
  21. 1चमचा ८. काश्मिरी मिरची पावडर:
  22. 1चमचा ९. बेडगी मिरची पावडर:
  23. १०. मीठ: चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    १. सर्वप्रथम चिकनचे सर्व तुकडे साफ धुवून घ्या. पुर्ण पाणी निथळू द्या. त्याच ताटात स्वच्छ धुतलेल्या, बटाट्याची साले न काढता बटाट्याच्या गोलाकार आकारात चकत्या कापून घ्या.
    २. चिकन आणि बटाट्याच्या फोडींना मीठ, घट्ट दही, हळद, काश्मिरी व बेडगी मिरची पावडर आणि मिरची, आलेलसूण वाटण अगदी व्यवस्थित लावून अर्धा तास मॅरिनेट करून ठेवा.
    ३. चिकन मुरेपर्यत आपण मसाले पाहुया काय काय लागतात आणि बनवुन घेऊया! काळे मिरे, धणे, जीरे, तमालपत्र आणि दालचिनी हलकीशी पॅनवर परतवा आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीकसर पण भरड अस

  2. 2

    ४. कढई गरम करून घ्या. जरा जास्तीचे तेल घाला आणि तेल गरम झाल्यावर मॅरिनेट केलेले चिकन व बटाट्याचे तुकडे टाकून परता. थोडे पाणी घालून वाफेवर १० ते १५ मिनिटे शिजवा.
    बटाटे आणि चिकन ला टुथपिक घालून शिजले कि नाही ते तपासू शकता. अगदीच शिजू देऊ नका.
    ५. एक-दोन लोखंडी शिगेमधे हे शिजवलेले चिकनचे तुकडे आणि बटाटे लावून गॅसवर, कोळशावर किंवा चुलीवर ठेऊन त्यांना ग्रिल करून घ्या. छान सर्व बाजूंनी ग्रिल करा.
    ६. परत कढई गॅसवर गरम करा. जरा जास्तच तेल ओता. तेल गरम झाल्यावर कढीपत्ता आणि कांदा टाका आणि परतत रहा. कांदा

  3. 3

    कांदा शिजला कि काळे मिरे-दालचिनी-जीरे-लवंग-तमालपत्र चा बनवलेला मसाला घालून परता.‌थोडे पाणी घालून दहा मिनिटे झाकण ठेवून वाफ द्या.
    ७. जाळीदार भांड्यामधे पोहे घ्या. एकदा अगदी हलकेच पाण्याने धुवा. (भुजिंगमधे सहसा सुकेच पोहे टाकतात पण मी थोडेसे स्वच्छ व्हावेत म्हणून हलकेच धुतले.) हे पोहे परतलेल्या कांद्यामधे मिक्स करून घ्या. लिंबूचा रस मिसळा. आणि भरपूर कोथिंबीर टाका.
    ८. ग्रिल केलेले चिकन आणि बटाटा टाकून पाच-दहा मिनिटे वरखाली करा. पाच मिनिटे झाकण ठेऊन वाफ काढा आणि झाकण काढल्यावर भन्नाट भुजिंगचा जबरदस्

  4. 4

    Please Note:
    1. मी ह्यावेळी चिकन आणि बटाटे शिजवताना आवडतो म्हणून तेलावर थोडा कांदा व कढीपत्ता घातला होता आणि चिकनला थोडेसे दहीदेखील लावले होते. हा व्टिस्टपण छान लागतो पण मुख्य प्रसिद्ध पोहा-भुजिंगची रेसिपी ढोबळमानाने वर सांगितल्याप्रमाणे असते. आगाशीकर वाडवळ आणि भंडारी समाजातील लोकांचा हे बनवण्यात हातखंडा आहे.
    2. नुसते हळद-मीठ-मिरची पावडर-काळेमिरे पावडर आणि मिरची-आले-लसूण वाटण ह्या माफफ साहित्यात देखील काहीजण उत्कृष्ट पोहा भुजिंग बनवतात.
    ३. चुलीवर चिकन भाजता आले तर एक छानशी ग्रिल्ड वास आणि चव

  5. 5

    केळीच्या हिरव्यागार पानावर पोहा भुजिंग वाढून थोडेसे लिंबू पिळून, भरपूर कोथिंबीर भुरभुरावी आणि कांद्याच्या चकत्या सोबत मस्त सर्व्ह करावे. ह्यातले सालं न काढलेले बटाट्याचे कापदेखील चिकनच्या रसामधे चांगले मुरल्याने उत्कृष्ट लागतात.
    थोडक्यात काय तर भन्नाट लागते हे... आणि हो लहानथोर सा-यांनाच आवडते. :)

    #भुजिंग #पोहा_भुजिंग #poha_bhujing #cookpad #virar #उत्सव #chicken_starter

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या (2)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
अहा.... मी खाल्ल आहे विरार ला .... खूपच टेस्टी लागत

यांनी लिहिलेले

Sneha Chaudhari_Indulkar
रोजी
Virar And Saphale
I love cooking, experimenting in kitchen, understanding various cultures, traditions and lifestyles through their cuisines. 🥣🍲🥗🥘I am owner of spice store called The Masala Bazaar. We are manufacturing spice blends, powders, pickles, papads and variety of cooking related products since 1984. 🌶️🍋🍘🍱I enjoy writing about food with memories around it. I keep collecting knowledge around recipes from various regions. 😃- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकरOur spice product related information is listed over here. 💁♥️🌿https://www.facebook.com/themasalabazaarstore/And here is our Official Website:www.themasalabazaar.comYou can connect on what's up for any recipe related query: 9890043675
पुढे वाचा

Similar Recipes