माकली रस्सा

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
Mumbai

माकली , माकुल , माखुळ , Fresh Squid , Calamari असे ह्या मासाचे नावे आहेत. हा मासा खाण्यास खूप चवीष्ट अगदी खोबर्या सारखे. पण माकली साफ करण म्हणजे थोडसं कष्टाचं काम आहे. ह्या मासाचे डोके,डोळे व शरीराचा भाग हाताने सहज वेगळे करता येते. माकली वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची, अश्या प्रकारे माकली साफ करा. आज आपण एक मस्त रेसिपी करु अगदी चिकन आणि मटणाला सुद्धा मागे टाकेल...तर चला साहित्य आणि कृती कडे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. १ मोठाकांदा
  2. १ लहान चमचालाल तिखट
  3. १ लहान चमचाहळद
  4. मीठ स्वादानुसार
  5. ७ ते ८कडिपत्ते
  6. चमचे २ मोठेतेल
  7. माकली मॕरिनेशन साठी
  8. आल लसूण कोथिंबीर पेस्ट
  9. १ लहान चमचालिंबाचा रस
  10. वाटणासाठी लागणारे साहित्य
  11. कप १/३ओलं खोबरं
  12. कप १/३सूखे खोबरं
  13. बेडगी मिरची
  14. चमचा १ मोठाधने
  15. चमचा १ मोठाजिरे
  16. ५ ते ६लसूण पाकळ्या
  17. चमचा १ मोठाकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम माकली साफ करुन धूवून घ्या
    मग त्याचे काप करुन घ्या
    मग माकलीला आल लसूण कोथिंबीर पेस्ट व लिंबू रस लावून ५ ते १० मि. ठेवून द्या

  2. 2

    ओलं व सूखे खोबरं, लसूण, कोथिंबीर, धने, जिरे, बेडगी मिरची व थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या

  3. 3

    एक खोलगट पातेल गरम करुन त्यात तेल घाला मग कडिपत्ते व कांदा घालून लालसर होईपर्यंत परतवून घ्या

  4. 4

    मग वाटलेला मसाला घालून चांगल भाजून घ्या

  5. 5

    आता लाल तिखट, हळद व स्वादानुसार मीठ घाला व मसाला चांगल परतवून घ्या

  6. 6

    मसाला तेल सोडायला लागलं की त्यात माकली घाला मिश्रण एकजीव करुन घ्या थोडसं गरम पाणी घालून १० ते १५ मि. वाफवून घ्या

  7. 7

    मग झाकण काढून मिश्रण पुन्हा एकजीव करुन घ्या

  8. 8

    मग उत्तम अशी गरमागरम माकली मसाला / ग्रेवी तयार
    चपाती, भाकरी, भाता सोबत खाऊ शकतो

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
रोजी
Mumbai
Foodieshttps://aartinijapkar.blogspot.comhttps://www.facebook.com/aarticakes.more
पुढे वाचा

Similar Recipes