#भरलेली_मसाला_शेवंडी 🦞🌿🌶️#Stuffed_Spiced_Lobster 🦞❤️

एडवणगावाजवळच्या कोरे गावामधून छान दर्जेदार आणि चविष्ट अशा मोठ्या आकाराच्या शेवंडी मिळतात. किंमतीला महाग पण चवीला अगदी जबरदस्त अशा ह्या शेवंडी म्हणजेच लाॅबस्टरचा एक वेगळाच चाहतेवर्ग आहे. दिसतातही आकर्षक. ह्यात काही निळसर छटेच्या शेवंडींना तर फार मागणी असते. वजनदार आणि टणक सालाच्या शेवंडी सोलून साफ करणे तसे कठीण काम. 🦞🌶️🌿 पण खवय्ये म्हटले कि हे आव्हानही सहज पेलतात.
शेवंडीचे स्टार्टर आम्ही अनेकदा बनवतो पण ह्यावेळी जोडल्या वेगळ्या पध्दतीने केले आहे. 🦞🧄🍤🌿❤️🌶️
कापताना धारधार सुरा किंवा विळीचा वापर करावा लागतो. शेवंडीच्या तोंडावरचे काटे टोचू नयेत म्हणून डोक्याचा भाग फडक्यात पकडून विळीवर कापून घ्यावेत. डोक्याच्या भागातील माती व घाण स्वच्छ धुवून काढावी. पाठीवर असलेला घाणीचा दोरा काढायचा. रस्सा किंवा अन्य रेसिपी वेळी पेरातून आडवे व बारीक तुकडे करावे. जाड साल टाकून द्यावी.🦞
चला भरलेली मसालेदार, बटर गार्लिक आणि लिंबाचा punch असलेली शेवंडी बनवुया. 😋 #सीफुड #seafood
#भरलेली_मसाला_शेवंडी 🦞🌿🌶️#Stuffed_Spiced_Lobster 🦞❤️
एडवणगावाजवळच्या कोरे गावामधून छान दर्जेदार आणि चविष्ट अशा मोठ्या आकाराच्या शेवंडी मिळतात. किंमतीला महाग पण चवीला अगदी जबरदस्त अशा ह्या शेवंडी म्हणजेच लाॅबस्टरचा एक वेगळाच चाहतेवर्ग आहे. दिसतातही आकर्षक. ह्यात काही निळसर छटेच्या शेवंडींना तर फार मागणी असते. वजनदार आणि टणक सालाच्या शेवंडी सोलून साफ करणे तसे कठीण काम. 🦞🌶️🌿 पण खवय्ये म्हटले कि हे आव्हानही सहज पेलतात.
शेवंडीचे स्टार्टर आम्ही अनेकदा बनवतो पण ह्यावेळी जोडल्या वेगळ्या पध्दतीने केले आहे. 🦞🧄🍤🌿❤️🌶️
कापताना धारधार सुरा किंवा विळीचा वापर करावा लागतो. शेवंडीच्या तोंडावरचे काटे टोचू नयेत म्हणून डोक्याचा भाग फडक्यात पकडून विळीवर कापून घ्यावेत. डोक्याच्या भागातील माती व घाण स्वच्छ धुवून काढावी. पाठीवर असलेला घाणीचा दोरा काढायचा. रस्सा किंवा अन्य रेसिपी वेळी पेरातून आडवे व बारीक तुकडे करावे. जाड साल टाकून द्यावी.🦞
चला भरलेली मसालेदार, बटर गार्लिक आणि लिंबाचा punch असलेली शेवंडी बनवुया. 😋 #सीफुड #seafood
कुकिंग सूचना
- 1
शेवंडी आपल्याला अख्खी तळायची असल्याने आपण पाठीवरती खोल उभ्या चिरा पाडून पाच शेवंडी घेतल्या. आणि सालही तशीच ठेवली. एकदा स्वच्छ धुवून पाणी पुर्ण निथळले. त्यातील तीन शेवंडी डोके अलगद वेगळे करून तशाच ठेवल्या. कारण आपल्याला या भरायच्या आहेत. आणि दोन शेवंडीचे तुकडे केले. सगळ्यांमधला मांसल गोळा अगदी सहज मोकळा होतो, तो काढून बारीक तुकडे म्हणजे खीमा केला.
- 2
शेवंडीच्या खीम्याला एका भांड्यामधे घेऊन त्यात मीठ, आले-लसूण-हिरवी मिरची व कोथिंबीर यांची मिक्सरमधून वाटून बारीक केलेली पेस्ट, लिंबूचा रस, गरम मसाला, सेलम हळद पावडर, बेडगी मिरची पावडर व पाव चमचा काळे मिरे पावडर एकत्रित करून व्यवस्थित लावून कालवून ठेवले. थोडा वेळ छान मॅरिनेट करून मुरवत ठेवले. गावठी लिंबूचा रस अगदीच मस्त होता.
- 3
एका पॅनला गरम करून त्यात तेल व अमुल बटर टाकले. त्यावर बारीक केलेल्या लसूणाचे तुकडे, काळे मिरे पावडर ची चिमुट टाकून अगदी छान परता. त्यात हा मॅरिनेट केलेला खीमा टाकून अगदी चांगले मिसळा. गॅस मोठा ठेऊनच हे जलदरित्या करा. हवे असल्यास अजून थोडे बटर टाका. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परता. गॅस मध्यम आचेवर ठेवून पंधरा ते वीस मिनिटे हे शिजू द्या. शेवंडीचे रिकामे कवच व डोके ह्यामधे हे मिश्रण अलगद भरा. हाताने शेवंडी दाबून घ्या. परत गॅसवर पॅनमधे तेल व बटर तापवून ह्या भरलेल्या शेवंडी खरपुस तळून घ्या.
- 4
प्लेटमधे मधोमध भरलेली शेवंडी ठेवा. शेवंडीचा डोक्याचा भाग मांसल आणि मुख्यतः भरलेला भाग नीट लावून घ्या. लिंबाचा रस आणि कोथिंबीर भुरभुरवा. कांदा, काकडी, टाॅमेटोच्या गोलाकार कापांनी छानपैकी सजवा. हे भरलेल्या शेवंडीचे स्टार्टर अगदी भारीच भाव खाऊन जाते. 🦞🌿😋🧄🍤 प्रत्येक बाईटला त्या शेवंडीचा तो गार्लिक बटर फ्लेवर भलताच जबरदस्त लागतो.
- 5
(Please Note: शेवंडी कशी साफ करावी:
बहुतेक ठिकाणी कोळिणींकडे छान दर्जेदार आणि चविष्ट अशा मोठ्या आकाराच्या शेवंडी मिळतात. वजनदार आणि टणक सालाच्या शेवंडी सोलून साफ करणे तसे कठीण काम. कापताना धारधार सुरा किंवा विळीचा वापर करा. शेवंडीच्या तोंडावरचे काटे टोचू नयेत म्हणून तोंड फडक्यात पकडून विळीवर कापून घ्यावेत. डोक्याच्या भागातील माती व घाण स्वच्छ धुवून काढावी. पाठीवर असलेला घाणीचा दोरा काढायचा. रस्सा, पुलाव किंवा अन्य रेसिपी वेळी पेरातून आडवे व बारीक तुकडे करावे. जाड साल टाकून द्यावी.)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरीचा मेथांबा (Kairicha Methamba Recipe In Marathi)
#KRRजेवणाची लज्जत वाढवणारा व कैरीचा अफलातून प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
कच्च्या पपईची भाजी (Kachya Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही टेस्ट साठी अतिशय चांगली आहे त्याबरोबरच लहान मुलांना आवर्जून द्यावी पटकन होणारी व औषधी भाजी आहे Charusheela Prabhu -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
चिंबोरी किंवा खेकड्याचा मस्त चमचमीत रस्सा किंवा कालवण🦀🦀🌿♥️💁🦀
चिंबोरीचा मस्त झणझणीत जाडसर रस्सा हा माझ्या बाबांचा आणि अभि चा सगळ्यात आवडता पदार्थ... मस्त भरलेली चिंबोरी बाजारात आली की आई आवडीने भरपुर खेकडे अभिसाठी आणते. गरमागरम वाफाळता भात, कापलेला कांदा-टाॅमेटो आणि झणझणित खेकडा रस्सा म्हणजे अफलातून जोडी...चांगला अर्धा पाऊण तास जेवण संपवायला लागतो.मस्त काळी मोठाली उत्तम चिंबोरी असली तर मग अजूनच भारी काम होते. आणि गाभोळी भरलेली म्हणजे अगदीच झक्कास काम... खेकड्याचे फांगडे किंवा डांगे दोरीने बांधून मुरडून दिले असतात. खेकडे, चिंबोरी म्हणा किंवा शेलफिश... मला त्याची अॅलर्जी असल्याने मी खायला धजावत नाही पण ह्या रस्स्याच्या अप्रतिम वासाने चव घ्यायचा मोह मात्र मी टाळत नाही.🍲🧄🌶️🥥भाईंदर ला भल्या पहाटे मोठाच्या मोठा मासोळी बाजार लागतो. गंमत म्हणून अभिबरोबर पहाटेच त्या मार्केटला गेलो. कोलंबी, सुरमई, पापलेट, रावस, बोंबील असे ताजे फडफडीत मासे टोपल्या, मोठे मोठे tray आणि पाट्यांमधून भरून मासेवाल्या विकत असतात. अगदी स्टेशनला लागून वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची चिंबोरीचे विक्रेते असतात. त्यांच्याकडून नीट शोधून चिंबोरी घेतली.🍲😀नायलाॅनच्या निळ्या जाळीत पकडलेली, फांगडे बांधलेल्या चिंबो-यांना घेऊन टोपलीत घालून मासेवाल्या बायका किंवा पुरूष विकायला आणतात... पोर्णिमे अमावस्ये वेळच्या चिंबो-या भरले-या असतात असे म्हणतात. चिंबोरी गरम त्यामुळे सर्दी खोकला झाला किंवा थंडी पडली कि आवर्जून हा रस्सा करतात. 🥘🦀🦀चिंबोरी मस्त भरलेली आणि काळसर पाठीची शोधून घ्यावीत. फांगडे किंवा डांगे अलगद काळजीपूर्वक मोडून घ्यावेत. माती लागली असेल तर घासून घ्यावी व चिंबोरी आतून देखील स्वच्छ करावी.#seafood #सीफुड Sneha Chaudhari_Indulkar -
चिझी व्हेजी सॅन्डविच (cheese veg sandwich recipe in marathi)
"चिझी व्हेजी सॅन्डविच"सॅन्डविच चे सुद्धा किती प्रकार असतात... आमच्या लहानपणी काकडी, टोमॅटो, गाजर स्वच्छ धुवून पुसून साल न काढता खायचे.. जेवताना कांदा कापून किंवा बुक्की मारून तोडायचा आणि खायचा..असे स्लाईस बनवा मग ब्रेड मध्ये भरा,चिझ ,बटर असलं काही नव्हते.असो..काळानुसार आपण ही बदल करून घेतला पाहिजे.. आमच्या घरी आवडणारा सॅन्डविच चा प्रकार.. लता धानापुने -
रेस्टॉरंट स्टाईल लसुनी दाल पालक (Restaurant Style Lasooni Dal Palak Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसातला कोवळा पालक आणि त्यामध्ये डाळ आणि लसणाचा तडका व त्याबरोबर बाजरीची भाकरी वाव सुपर कॉम्बो Charusheela Prabhu -
फणसाच्या आठल्याचे कटलेट (Jackfruit Seed Cutlet Recipe In Marathi)
#LORफणसाच्या आठळ्या अतिशय टेस्टी असतात त्या सर्व धुवून वाळवून त्याची सालं काढून त्याचा परत आपण रियूज करू शकतो त्याचे मी कटलेट केलेत अतिशय टेस्टी झालेत Charusheela Prabhu -
नाशिकचा सुप्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi)
#KS2मंदिरांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची खाद्यसंस्कृती तितकीच अफलातून आहे. कधीकाळी चिवडा, जिलेबी, खव्यापर्यंत मर्यादीत असलेल्या नाशिकमध्ये साऊथ इंडियन, इटालियन व अमेरिकन अशा मल्टी क्युझिन फूड्सची व्हरायटी आहे. असे असले तरी अनेकदा खवय्ये मंडळींना जुन्या पध्दतीने बनविलेल्या पदार्थांची आठवण होते. असाच एक नाशिकमधील सुप्रसिद्ध 'पाववडा'हा पाववडा दोन प्रकारे केला जातो .एक म्हणजे ,बटाटा भाजी पावामधे भरून आणि दुसरी पद्धत फक्त बेसनाच्या मिश्रणात डिप करून पाव तळले जातात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बटाटा फ्राय भाजी (Batata fry bhaji recipe in marathi)
पटकनहोणारी व अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे तेलावर नुसती फ्राय केली आणि वाफेवर शिजवली की पटकन होते व टेस्ट खूप छान असते Charusheela Prabhu -
पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण (Bomblanch kalvan Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील , आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण दाखवणार आहे. कृती:- त्यासाठी पाच ते सहा बोंबील घेऊन ते साफ करून घ्यायचे आणि त्याचे चार ते पाच तुकडे करायचे .त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे तेल, दोन चमचे वाडवळी मसाला किंवा घरचा मसाला,एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण पेस्ट त्यामध्ये टोमॅटो एक किसून घालायचा, त्यामध्ये चिंचेचा कोळ अर्धा वाटी आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ हे सर्व बोंबला मध्ये एकत्र करून चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तुमच्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे रस्सा वाढवायचा आणि पाच मिनिटानंतर गॅसवर भाजी ठेवून एक ऊकळा घेणे वरून थोडी कोथिंबीर बारीक कापून घालणे .झटपट बोंबलाचा रस्सा रेडी....#AV धन्यवाद 🙏 Ashwini Patil -
फ्लावर.. बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी व झटपट होणारी चविष्ट व पौष्टिक भाजी Charusheela Prabhu -
-
शेवग्याच्या शेंगांची मसाला आमटी (Shevgyachya Shengachi Masala Amti Recipe In Marathi)
#JLRशेवग्याच्या शेंगा व त्याची मसाला घालून केलेली आमटी भात तोंडी लावायला पापड लोणचं म्हणजे अतिशय सुंदर व टेस्टी Charusheela Prabhu -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व असतात. nilam jadhav -
फोडणीची मसाला इडली (Fodnichi Masala Idli Recipe In Marathi)
#ZCRनेहमी इडली चटणी सांबार खाऊन कंटाळा आला की अशी चटकदार फोडणीची इडली खाल्ली की खूप छान लागते व डब्यातही देऊ शकतो Charusheela Prabhu -
एग्ज ऑन पोटॅटो (eggs on potato recipe in marathi)
#अंडा बटाटा#peपारंपारिक पारशी रेसिपी सल्ली पर ईडू ज्याच्यात पारशी लोकं बटाट्याच्या सळीला मसाला लावून व त्यावर अंडी घालून बेक करतात. ही डिश त्यांच्यात नाश्त्याला खातात. पण बटाटे कापून घातले की ते आपण जेवणासाठी पण वापरु शकतो. Yadnya Desai -
कांद्याची गोल भजी (Kandyachi Gol Bhajji Recipe In Marathi)
#BPRकांद्याची गोल भजी पावसाळ्यात व जेवताना खायला किंवा नुसतीच खायला खूप छान वाटतात Charusheela Prabhu -
मुगलेट (Moonglet Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व हेल्दी होणार हे मुगलेट रात्रीच्या डिनर साठी किंवा नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
-
मलाई आलू मटर (Malai Aloo Matar Recipe In Marathi)
आलू मटर खूप छान लागतात त्याच्यात मलाई घातली की ते अजून सुंदर होतात Charusheela Prabhu -
सोया खिमा (Soya Keema Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी होणारा व डब्यातही चालणारा हा सोया किंवा तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
#झटपटमॅगी ही दोन मिनिटात होणारी आणि त्यात काहीतरी ट्विस्ट आणून एक हेल्धी झटपट असे हे मॅगी ऑमलेट बनवले आहे.... तुम्ही पण नक्की ट्राय करा.... पटकन होते... आणि यम्मी लागते.... Aparna Nilesh -
रवा ढोकळा (Rava Dhokla Recipe In Marathi)
झटपट होणारा चविष्ट खमंग फुगलेला असा हा रवा ढोकळा नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
चांद मोमोज (momos recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6आज मी मोमोज बनवले आणि आठवले मॅडम मी आपल्याला चांद च्या आकाराचे बनवायला लावलेले आहेत कोणतेही पदार्थ म्हणून मी मोमोज चांद बनवायचा प्रयत्न केला पण तितका यशस्वी झालेला नाही पण टेस्ट खूप छान झालेली आहे खरंच तुम्ही खाऊन बघा Maya Bawane Damai -
माकली रस्सा
माकली , माकुल , माखुळ , Fresh Squid , Calamari असे ह्या मासाचे नावे आहेत. हा मासा खाण्यास खूप चवीष्ट अगदी खोबर्या सारखे. पण माकली साफ करण म्हणजे थोडसं कष्टाचं काम आहे. ह्या मासाचे डोके,डोळे व शरीराचा भाग हाताने सहज वेगळे करता येते. माकली वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची, अश्या प्रकारे माकली साफ करा. आज आपण एक मस्त रेसिपी करु अगदी चिकन आणि मटणाला सुद्धा मागे टाकेल...तर चला साहित्य आणि कृती कडे Chef Aarti Nijapkar -
"स्ट्रीट स्टाईल एग रोल" (street style egg roll recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_Roll "स्ट्रीट स्टाईल एग रोल" आमच्याकडे पुर्वी आजी, आई मावशी म्हणायचे पराठा हा काय नवीन पदार्थ नाही...अरे भाजी सोबत चपाती खाल्ली काय आणि चपाती च्या आत भाजी घातली काय..चव सारखीच असते.. पण माझं म्हणणं आहे काळानुसार बदल करून घ्यावा आपणच... आपणही नवीन पदार्थांची चव चाखायला काय हरकत आहे... मला तर हे असे नवीन पदार्थ करून बघायला खुप आवडते.. भलेही मी खाईल किंवा नाही खाणार..हो कारण हे पिझ्झा, पास्ता नाही आवडत मला...पण स्वतः बनवणे हे मात्र आवडीचे काम.. या सगळ्या आठवणी आज अंडा रोल बनवताना जाग्या झाल्या..पण खुप छान वाटले बनवुन आणि खाताना पण मजा आली.. आवडलं मला.. चला तर मग रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
तांदळाच्या रव्याचा सांजा (Tandalachya Ravyacha Sanja Recipe In Marathi)
#BRRतांदूळ धुऊन भाजून त्याचा केलेला रवा व त्याचा सांजा अतिशय सुंदर लागतो Charusheela Prabhu -
गुजराती खट्टा ढोकळा (gujarati khatta dhokla recipe in marathi)
#Cookpad#पश्चिम भारत #गुजरातआपला भारत देश अनेक प्रांत, भाषा, संस्कृती व खाद्यसंस्कृती असलेला संपन्न देश आहे. आपली महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती नेहमीच गौरवली गेली. पण देशाच्या पश्चिम भागातील सुद्धा शुद्ध शाकाहारी पदार्थ माझ्या खास आवडीचे. त्यातीलच आज गुज्जूभाईंचा व आमच्या घरातील समस्त मंडळींचा आवडीचा "खट्टा ढोकळा" बनविला. Swati Mahajan-Umardand -
व्हेजी लोडेड सात्विक खिचडी (veg khichadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्त्विक आहार हे सत्त्वगुण किंवा सत्व प्रकृतीचे गुण आहे.शुद्धता हा मुख्य गुणधर्म असणारे वस्तुंना सात्त्विक संबोधले जाते.एखादी वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक असण्यासाठी कोणताही रोग, वाईट शक्ति किंवा त्यांच्यामुळे दुषितपणा पसरणार नाही हे आवश्यक असते, तसेच ती कोणत्याही इतर मुलद्रव्यांपासून दुषित असता कामा नये.ज्या वस्तुंमुळे किंवा व्यक्तींमुळे त्यांच्या आस्तित्वाने आजुबाजूचे वातावरण शुद्ध होते अशा वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक असतात.जेव्हा एखादी व्यक्ती सात्त्विक अन्न ग्रहण करते (खाते) त्यावेळी तिला शुद्धतेचा अनुभव मिळुन मनाचे समाधान मिळते.तशीच आज मी सात्विक अशी खिचडी केलेली आहे.भरपूर भाज्या आणि तांदूळ यांचे एकत्रित मिश्रण करून गरमागरम बटर सोबत उत्तम अशी लागणारी सात्वीक खिचडी.चला तर बनवूया व्हेजी लोडेड सात्विक खिचडी. Ankita Khangar -
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा भाजी
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा ह्याची भाजी दाखवणार आहे .साहित्य:- वर्षभर भरलेला आपण पाण्यातला आंबा ,एक खाडीची कोलंबी ,आलं लसूण मिरची कोथिंबीर यांचे वाटण तीन चमचे आणि मसाला दोन चमचे, हळद एक चमचा ,मीठ चवीनुसार, दोन पळी तेल.कृती :- सर्वप्रथम कोलंबी साफ करून तेलावर तळायची. त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा, एक मोठा टोमॅटो बारिक कापून घालायचं ,ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटण, मसाला, हळद ,चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. एक बटाट्याच्या बारीक काप करून त्या भाजीत घालाव्यात ,त्या भाजी मध्ये थोडे पाणी घालून बटाटा शिजवून आणि कोळंबी शिजवुन घ्यावी .बटाटा शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये पाण्यातला आंबा बारीक कापून घालावा भाजी शिजून द्यावी. त्यानंतर आपल्या घरात जशी माणसं असेतील ,त्याप्रमाणे भाजीत रस्सा ठेवावा. रशाला अर्धा चमचा तांदळाचं पीठ लावून घ्यावं आणि भाजी मिक्स करून घ्यावी .एक ऊकळा भाजीचा घ्यावा .सुंदर अशी आपली खाडीत कोलंबी आणि पाण्यातला आंब्याची भाजी रेडी 🙏🏻#AV Hinal Patil
More Recipes
टिप्पण्या