काट्याचं_कालवण

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#लॉकडाऊन पाककृतीं

काट्याचं कालवण,हा s हा s!हे म्हणजे काही बोरी बाभळीच्या काट्याचं कळवण नाही. हे घोळीच्या काट्याचं कालवण आहे

अलिबागच्यापासून ते डहाणू, सातपाटी आणि दीवदमणपर्यंतच्या समुद्र आणि खाडीपट्टा म्हणजेे हलवा, बोंबील, सुरमई, रावस, बोई, शिंगट्या,तसेच सफेद/काळी/हिरवी/पिवळी आणि टायगर कोळंबी, करंदी, जवळा, करली,भिंग,पाला असे वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण मासे आणि त्याचबरोबर घोळ मिळण्याचे हक्काचे पाणी.

घोळ म्हणजे नव्याने मासे खाणाऱ्या लोकांसाठी उत्तम मासा कारण याचे तुकडे काटाविरहित असतात.पण याच काटा मात्र मांसविरहित असत नाही.काटा खाणे आणि त्याचे मणके फोडन मणी खाणे हे येरागबाळ्याचे काम नाही.तीक्ष्ण दातांचे काम आहे खरे,पण तो तुम्हाला फोडता आला तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच,यात बिलकुल शंका नाही

हा काटा इतर माशांच्या काट्यांसारखा नाजूक नसून कडक असतो ,म्हणून असेल पण जेव्हा खायचे असेल तेव्हाच कालवण करून संपवावे, नाहीतर उग्र वास येतो.मला तरी तो आवडत नाही,त्यामुळे मी एक वेळी संपेल इतकेच कालवण करते.ही विशेष सुचवणी आहे.

आता मात्र वेळ न घालवता काट्याच्या कालवणाची कृती देते तुम्हाला.

घ्या साहित्य जमबायला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दोन
  1. .अर्धी वाटी ओलं खोबरं
  2. . अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून,
  3. . बारा लसूण पाकळ्या
  4. . एक इंच आलं
  5. . एकहिरवी मिरची
  6. . एक लहान कांदा बारीक चिरून
  7. . एक चहाचा चमचा संडे मसाला
  8. . अर्धा चमचा हळदपूड
  9. . सात/आठ कोकम
  10. . दोन पळ्या तेल
  11. .मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    काट्याचे तुकडे धुवून,निथळून घ्या.

  2. 2

    खोबरं,कोथिंबीर,आलं,मिरची,
    आणि दोन पाकळ्या वगळून लसूण यांचं मुलायम वाट करा.

  3. 3

    वाटण तुकड्यांना चोळून दहा मिनिटे मुरू द्या.

  4. 4

    भांड्यात तेल गरम करून उरलेल्या लसूणपाकळ्या ठेचून घाला.

  5. 5

    लालसर झाल्या की कांदा घालून पारदर्शक होईपर्यंत परता.

  6. 6

    संडे मसाला आणि हळदपूड घालून परता.

  7. 7

    वाटण लावलेले तुकडे घालून परता,सगळीकडे मसालायुक्त तेल लागेल याची काळजी घ्या.

  8. 8

    तुकडे बुडतील इतके कोमट पाणी घाला.छान उकळी येउद्या.आच मंद करून वर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजूद्या. गॅस बंद करा.दहा मिनिटे तसेच गॅसवर राहुद्या.

  9. 9

    गरमागरम वाफाळत्या भातासोबत आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नूतन सावंत
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes