काजूची उसळ आणि मालवणी काकडी वडे(kajuchi usal ani malwani kakdi wade recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रेसिपीबुक
#week2
#गावाकडची आठवण
माझी आजी(आईची आई) आम्ही गावाला गेलो की ओले काजू सुकवून ठेवलेले काढून मस्त काजूची उसळ करायची त्यापुढे चिकन म्हणजे काहीच नाही. माझी आजी अक्षरशः कंबरेत वाकलेली पण तिला कोणी वाटण वाटलेलं आवडायचं नाही ती स्वतः हाताने वाटण वाटायची, आम्ही तिला मदत करायला गेलो की म्हणायची तुम्हाला नाही येणार एकदम बारीक वाटायला. मस्त चुलीत कांदा आणि ओलं खोबऱ्याचे तुकडे खरपूस भाजायची आणि ते वाटण घालून केलेली आजीच्या हातची चव तर अप्रतिमच, आता आजीला खुप मिस करतो तिची खूप आठवण येते. आम्ही मुंबईला यायच्या अगोदर एवढी तिची लगबग चालू असायची की काय करू नि काय नको असं व्हायचं तिचं, मग गुपचूप तांदळाच्या पिठात गावठी अंडी किंवा ओले सुकवून ठेवलेले काजूगर बांधून द्यायची तसेच खोबऱ्याच्या वड्यांचा तर आदल्या दिवशीच घाट घालायची, मग तांदूळ, कुळीथ पीठ, तांदळाचं पीठ, आंबे, काजूगर, फणस यांची भेट असं करून एक गोणीच भरायची आणि मामाला पाठवायची गाडीपर्यंत. शेवटी निरोप अश्रू भरल्या डोळ्यांनी द्यायची आणि आम्ही तिचा निरोप घेऊन गावच्या आठवणी घेऊन मुंबईला परतायचो. गेले ते क्षण, राहिल्या त्या आठवणी. आज तिला जाऊन २०-२५ वर्ष झाली असतील पण तिच्या आठवणी मनातून जात नाहीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

९० मिनिटे
६ जण
  1. काजूची उसळ बनविण्यासाठी
  2. ५० ग्राम काजू
  3. 2बटाटे
  4. 2शेंगा
  5. 1कांदा
  6. 1टोमॅटो
  7. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  8. 2 टीस्पूनमालवणी मसाला
  9. 1/4 टीस्पून हळद
  10. 1 टीस्पून धनेजिरेपूड
  11. चवीपुरतं मीठ
  12. आवश्यकतेनुसार पाणी
  13. वाटणासाठी :
  14. 1 कपओलं खोबरं
  15. 1/2 कपसुकं खोबरं
  16. 2कांदे
  17. 6लसूण पाकळ्या
  18. १" आलं
  19. आवश्यकतेनुसारतेल (तळण्यासाठी, फोडणीसाठी)
  20. वडे बनविण्यासाठी :
  21. ५०० ग्राम वड्याचं पीठ (रेडिमेड)
  22. 2गावठी काकड्या
  23. 1/4 टीस्पून हळद
  24. चवीनुसारमीठ
  25. आवश्यकतेनुसारपाणी

कुकिंग सूचना

९० मिनिटे
  1. 1

    काजू रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. काकडी साल काढून किसून घ्या आणि भांड्यात घालून त्यात मीठ, हळद घाला व ५ मिनिटे शिजवून घ्या. वड्याचं पीठ परातीत चाळून घेऊन मध्ये खोलगट करा त्यात काकडीचे शिजलेले मिश्रण घाला व चांगले एकजीव करा.

  2. 2

    पाणी अंदाजे पीठाला साधारण लागेल इतकं घेऊन त्यात थोडं मीठ, १ टिस्पून तेल घालुन उकळी काढा. व हे पाणी पिठात थोडं थोडं घालून चमच्याने पीठ मिक्स करा नंतर हाताने मळून घ्या थोडं घट्टसर मळा (कारण ते ४ तासानंतर थोडं सैल होतं) ३-४ तास झाकून ठेवा.

  3. 3

    वाटणासाठी तव्यावर उभा चिरलेला कांदा, सुकं खोबरं किसलेलं घालून लालसर होईपर्यंत परता नंतर त्यात तेल घालून आलं लसूण, ओलं खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या (मी खोबरं भाजताना त्यात थोडी मिरी, १ लवंग, दालचिनीचा छोटा तुकडा, १ टिस्पून धणे, थोडी खसखस घातली. नाही घातली तरी चालेल)

  4. 4

    कढईत तेल घालून कांदा व टोमॅटो चिरलेला घालून परता. नंतर आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, हळद, धनेजिरेपूड, मीठ घालून परता. नंतर त्यात बटाटे, शेंगा, काजू घालून मिक्स करा. रस्स्यासाठी हवं तेवढं पाणी घालून शिजवा.

  5. 5

    आता वाटण घालून शिजवा. तयार आहे काजूची शेंग बटाटा घालून केलेली उसळ

  6. 6

    वड्याचं पीठ मळून गोळे करा, कढईत तेल तापत ठेवा. पिठाचे गोळे घेऊन प्लास्टिक पेपरवर तेल लावून वडे थापा. तेलात सोडा वरून झाऱ्याने दाब द्या म्हणजे वडे गरगरून फुगतील, दोन्ही बाजूनी भाजून टिशू पेपरवर काढा. हे काकडीचे वडे काजूची उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ, किंवा चिकन बरोबर खुप छान लागतात. गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes